Paytm Crisis : पेटीएम पेमेंट्स बँकेवरील कारवाईनंतर पेटीएम युपीआयची बाजारातील हिस्सेदारी आली ९ टक्क्यांवर

Paytm Crisis : मार्च महिन्यात भारतात १.२ अब्ज व्यवहारांसाठी पेटीएम वापरलं गेलं. 

181
Paytm Crisis : पेटीएम पेमेंट्स बँकेवरील कारवाईनंतर पेटीएम युपीआयची बाजारातील हिस्सेदारी आली ९ टक्क्यांवर
  • ऋजुता लुकतुके

ऑनलाईन युपीआय पेमेंट्सच्या बाबतीत एकेकाळी आघाडीवर असलेली पेटीएम ही फिनटेक कंपनी अजूनही संकटातून सावरलेली नाही. पेमेंट्स बँकेवरील बंदी लागू झाल्यापासून युपीआय व्यवहारांनाही फटका बसला आहे. मार्च महिन्यात पेटीएम (Paytm) युपीआयची बाजारातील हिस्सेदारी ९ टक्क्यांवर आली आहे. फेब्रुवारीत ती ११ टक्क्यांवर होती. व्यवहारांचा आकडा बघितला तर मार्चमध्ये एकूण १.२ अब्ज व्यवहार पेटीएम युपीआयमधून झाले. फेब्रुवारीत हे प्रमाण १.३ अब्ज इतकं होतं. (Paytm Crisis)

पेटीएमच्या (Paytm) घसरणीचा फायदा अर्थातच फोनपे आणि गुगल पे या प्रतिस्पर्धी कंपन्यांना मिळाला आहे. गुगल पेवर मार्च महिन्यात ५ अब्ज व्यवहार झाले. हेच प्रमाणे फेब्रुवारीत ४.७ अब्ज तर जानेवारीत ४.५ अब्ज इतकं होतं. म्हणजे गुगल पे (Google Pay) च्या व्यवहारांमध्ये ६ टक्क्यांहून जास्त वाढ झाली आहे. तर फोन पे च्या माध्यमातून मार्च महिन्यात ५.७ अब्ज इतके व्यवहार झाले. (Paytm Crisis)

(हेही वाचा – IPL 2024 Rishabh Pant : रिषभ पंतची दिनेश कार्तिकच्या ‘या’ विक्रमाशी बरोबरी)

कोव्हिड नंतरच्या काळात जेव्हा भारतीय बाजारांमध्ये ऑनलाईन पेमेंट्सच्या बाबतीत जागरुकता निर्माण झाली तेव्हा म्हणजे २०१८-१९ च्या काळात पेटीएमचा (Paytm) युपीआय व्यवहारातील हिस्सा ४० टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. तोच आता घसरून ९ टक्क्यांवर आला आहे. फोन पे आणि गुगल पे नंतर २०२२ पर्यंत पेटीएमची हिस्सेदारी १३ टक्क्यांवर खाली आली होती. १५ मार्चला रिझर्व्ह बँकेनं पेटीएम पेमेंट्स बँकेवर निर्बंध लादल्यानंतर पेटीएम युपीआय आता थर्ड पार्टी ॲप्लिकेशन प्रोव्हायडर म्हणून काम करतं. गुगल पे आणि फोन पे ही याच धर्तीवर काम करतात. त्यासाठी पेटीएमने ॲक्सिस बँक, येस बँक, स्टेट बँक आणि एचडीएफसी बँक यांच्याशी करार केले आहेत. या बँकांच्या माध्यमातून पेटीएम युपीआयचे व्यवहार होतात. येणारे दिवस अजूनही पेटीएम (Paytm) या फिनटेक कंपनीसाठी अवघडच असतील असं दिसतंय. (Paytm Crisis)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.