काँग्रेसच्या निवडणूक घोटाळ्याचे पहिले बळी ठरले होते Dr. Babasaheb Ambedkar

ज्या डॉ. आंबेडकरांविषयी काँग्रेस आज ममत्व दाखवत आहे, त्याच काँग्रेसने निवडणूक घोटाळा करून डॉ. आंबेडकर यांना पराभूत केले होते, हा इतिहास आहे.

409
  • नित्यानंद भिसे 

सध्या काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत भाजपाला विरोध करण्यासाठी संविधानाचा आधार घेणे सुरु केले आहे. भाजपा पुन्हा सत्तेत आली तर संविधान बदलणार, देशात हुकूमशाही येणार, देशात पुन्हा निवडणुका होणार नाही, असा खोटा प्रचार केला जात आहे. ज्या डॉ. आंबेडकरांनी (Dr. Babasaheb Ambedkar) संविधान लिहिले तेच भाजपाला आता नको आहे, असे जनतेत पसरवण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे. तसेच भाजप निवडणुकीत निवडणूक यंत्रणेचा वापर करून निवडणूक लढवत असल्याचाही आरोप करत आहे. वस्तुतः काँग्रेसनेच मागील ७० वर्षांत ९८ वेळा संविधानात दुरुस्ती करून त्याची मोडतोड केली आहे. तरीही काँग्रेस भाजपावर संविधान बदलणार असल्याचा आरोप करत आहे. ज्या डॉ. आंबेडकरांविषयी काँग्रेस आज ममत्व दाखवत आहे, त्याच काँग्रेसने निवडणूक घोटाळा करून डॉ. आंबेडकर यांना पराभूत केले होते, हा इतिहास आहे.

१९५२च्या निवडणुकीत ५० हजार मते बाद झाली की केली?

आज जेव्हा देशात लोकसभा निवडणुकीची धामधूमी सुरु आहे, त्यामध्ये काँग्रेस भाजपावर निवडणूक यंत्रणेचा वापर करत आहे, निवडणूक आयोगावर दबाव टाकत आहे, असे आरोप करत आहे. प्रत्यक्षात निवडणुकांमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवाराला येनकेन प्रकारेण कसे पराभूत करायचे, त्यासाठी प्रसंगी नियमांचे उल्लंघन करायचे असे धोरण स्वतः काँग्रेसने देश स्वातंत्र्य झाल्यानंतर पहिल्याच निवडणुकीपासून स्वीकारले होते. ज्याचे पहिले बळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) ठरले होते. ती निवडणूक होती १९५२ची पहिली लोकसभा निवडणूक. त्यावेळी डॉ. आंबेडकर त्यांच्या सोशालिस्ट पार्टीच्या माध्यमातून उत्तर मुंबईमधून लोकसभा निवडणूक लढवत होते. त्यावेळी काँग्रेसने त्यांच्या विरोधात नारायण काजरोळकर यांना उमेदवारी दिली होती. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना १ लाख २३ हजार ५७६ मते मिळाली होती, तर काजरोळकर यांना १ लाख ३७ हजार ९५० मते मिळाली होती. त्यावेळी जवळपास ७४ हजार ३३३ मते मतपत्रिकेवर दोनवेळा शिक्के मारल्यामुळे ती रद्द झाली. डॉ. आंबेडकर यांनी निवडणूक यंत्रणेवर दोषारोप करत याविरोधात निवडणूक आयोगाकडे याचिका दखल केली होती, त्यात त्यांनी या कारस्थानामध्ये काँग्रेसला कम्युनिस्ट पार्टीने मदत केल्याचा गंभीर आरोप केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे या देशातील निवडणूक घोटाळ्याचे पहिले बळी होते. सुप्रसिद्ध अमेरिकन लेखिका गेल ओमवेद यांनी त्यांच्या पुस्तकातही डॉ. आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या त्या याचिकेचा उल्लेख केला आहे. याबद्दल कधीही चर्चा होत नाही. अशा प्रकारे काँग्रेसने देशाच्या पाहिल्याच निवडणुकीत निवडणूक यंत्रणा ताब्यात घेऊन प्रतिस्पर्धी उमेदवाराला पराभूत करण्याचे कारस्थान रचले होते. याचा सविस्तर उल्लेख लेखक पद्मभूषण धनंजय कीर यांनी लिहिलेल्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर – चरित्र’ या पुस्तकात केला आहे.

(हेही वाचा Arvind Kejriwal: जेलमध्ये बसुन केजरीवाल खाताहेत गोड धोड, काय आहे केजरीवालांचा नवा डाव?)

१९५४च्या पोटनिवडणुकीतही काँग्रेसने डॉ. आंबेडकरांना हरवले

काँग्रेसने केवळ १९५२ मध्ये झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीतचा डॉ. आंबेडकरांचा (Dr. Babasaheb Ambedkar) पराभव केला नव्हता तर १९५४ साली पुन्हा एकदा डॉ. आंबेडकर लोकसभा निवडणुकीत उभे राहिले होते. ती निवडणूक होती भंडारा येथील लोकसभेची पोटनिवडणूक. या निवडणुकीत डॉ. आंबेडकर यांना १ लाख ३२ हजार ४८३ मते मिळाली, पण त्यांचा पराभव झाला होता, त्याही निवडणुकीत काँग्रेसचे डॉ. आंबेडकरांच्या विरोधात बाबुराव बोरकर यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत प्रजा सोशालिस्ट पार्टीचे प्रकाश मेहता विजयी झाले होते. याही निवडणुकीत काँग्रेसने डॉ. आंबेडकरांना पराभूत करण्यासाठी रणनीती आखली होती.

काँग्रेसच्या राजकीय कुटनीतीमुळे डॉ. आंबेडकरांचा झाला शेवट

देशाचे संविधान लिहिलेले डॉ. आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्याकडे देशाच्या विकासाच्या दृष्टीने रोडमॅप तयार होता. त्यासाठी त्यांना संसदेत येण्याची तीव्र इच्छा होती. पण डॉ. आंबेडकरांना काँग्रेसने दोन्ही वेळी संसदेत येऊ दिले नाही. त्यामुळे डॉ. आंबेडकर खऱ्या अर्थाने मनाने खचले होते. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडत चालली. भंडाराच्या पोटनिवडणुकीतील पराभवानंतर ते अधिकच आजारी पडू लागले आणि शेवटी ६ डिसेंबर १९५६ रोजी त्यांचे दुःखद निधन झाले. असे स्वतः डॉ. आंबडेकरांच्या पत्नी सावित्रीबाई आंबेडकर यांनी म्हटले आहे. १९५२ मध्ये झालेल्या निवडणुकीतील पराभवानंतर सावित्रीबाई यांनी डॉ. आंबेडकरांचे अत्यंत जवळचे मित्र कमलकांत चित्रे यांना पत्र पाठवले होते, ज्यात त्यांनी लिहिले होते की, ‘राजकारण हे डॉ. साहेब (आंबेडकर) यांचे जीवन आहे. त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी ते शक्तिशाली औषध आहे. त्यांना संसदीय कामकाजात प्रचंड रस आहे. त्यांचा आजार शारीरिक नसून मानसिक आहे. निवडणुकीतील पराभव त्यांनी सहन केला असला तरी त्या मागील राजकीय घडामोडींमुळे त्यांच्या प्रकृतीत चढउतार होत आहेत. डॉक्टर साहेब (आंबेडकर) यांनी लोकसभेवर निवडून आल्यास कोणते काम हाती घेणार याचे नियोजन आधीच केले होते. त्यांच्या कीर्ती आणि कर्तव्यासाठी लोकसभा हे योग्य ठिकाण आहे.’

(हेही वाचा BJP: आता प्रत्येक आमदाराचं रिपोर्ट कार्ड तयार होणार, लीड देणार नाही त्याचं तिकीट धोक्यात; भाजपचे नवे धोरण)

म्हणूनच आज काँग्रेसवाले मतांच्या राजकारणासाठी संविधान बचाव म्हणून गळा काढत असले आणि जय भीमचा नारा देत असले तरी प्रत्यक्षात त्याच काँग्रेसने डॉ. आंबेडकरांना (Dr. Babasaheb Ambedkar) राजकीय शत्रू मानले होते आणि त्यांचे राजकीय खच्चीकरण केले होते, हा इतिहास आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.