Mumbai Crime : मनपाच्या एन वॉर्डमध्ये विनयभंगाचा प्रकार; कारकुनास अटक

पंतनगर पोलिसांनी या प्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल करून मनपा क्लार्क युनूस शेख याला अटक केली आहे. शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.

466
Mumbai Crime : मनपाच्या एन वॉर्ड मध्ये विनयभंगाचा प्रकार, क्लार्कला अटक

मैत्रिणीच्या मुलाचा जन्मदाखला घेण्यासाठी मनपा एन वार्डमध्ये गेलेल्या २२ वर्षीय तरुणीकडे शरीरसुखाची मागणी केल्याप्रकरणी महानगरपालिकेच्या ५२ वर्षीय कारकून क्लार्क युनूस शेख विरुद्ध पंतनगर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. (Mumbai Crime)

पीडित तरुणी ही साकीनाका येथे राहते, तिच्या बालपणाच्या मैत्रीणाचा विवाह झाल्यानंतर ती कल्याण येथे राहण्यास गेली. गेल्यावर्षी पीडितेची मैत्रीण ही बाळंतपणासाठी साकीनाका येथे आली होती. घाटकोपर पूर्व येथील एका खाजगी रुग्णालयात ती बाळंत झाली होती. तिच्या बाळाची नोंद मुंबई मनपा एन वॉर्ड येथे करण्यात आली होती. तेथून तिला बाळाचा जन्मदाखला देण्यात आला होता, परंतु जन्म दाखल्यातील आईचे नाव चुकल्यामुळे पीडितेच्या मैत्रिणीने पीडितेला एन वॉर्डमध्ये जाऊन अर्ज करून नवीन दाखला काढण्यास सांगितला होता. (Mumbai Crime)

(हेही वाचा – Paytm Crisis : पेटीएम पेमेंट्स बँकेवरील कारवाईनंतर पेटीएम युपीआयची बाजारातील हिस्सेदारी आली ९ टक्क्यांवर)

आरोपीला करणार न्यायालयात हजर 

जानेवारी महिन्यापासून सुधारित दाखला मिळावा म्हणून पीडित तरुणी एन वार्डच्या आरोग्य विभागातील जन्म-मृत्यू विभागात येरझाऱ्या मारत होती, आरोपी युनूस शेख हा पीडितेला मागील चार महिन्यापासून सुधारित जन्मदाखला देण्यासाठी टाळाटाळ करीत होता. त्याने पीडितेसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पीडितेने त्याकडे दुर्लक्ष केले होते. (Mumbai Crime)

गुरुवारी सकाळी पीडिता ही मानलेल्या भावासोबत एन वार्ड येथे जन्म दाखला संदर्भात चौकशी करण्यासाठी गेली असता, युनूस शेख याने पीडितेच्या अंगावर हात फिरवून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. या घटनेने घाबरलेल्या पीडितेने मैत्रीणीच्या भावासोबत पंतनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पंतनगर पोलिसांनी या प्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल करून मनपा कारकून युनूस शेख याला अटक केली आहे. शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. (Mumbai Crime)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.