- ऋजुता लुकतुके
मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज (IPL 2024, MI vs PBKS) या सामन्यात मुंबईने पंजाबचा ९ धावांनी निसटता पराभव केला. आणि यात मुंबईचा तेज गोलंदाज जसप्रीत बुमराने (Jasprit Bumrah) २२ धावांत ३ बळी मिळवत महत्त्वाची भूमिका निभावली. यातला एक बळी बुमराने इनस्विंग यॉर्करवर घेतलेला होता. रिली रसॉला त्याने एका धावेवर त्रिफळाचीत केलं. रसॉला चेंडूचा अंदाजच आला नाही. आणि यष्ट्या अक्षरश: तुटल्या. कुठल्याही अव्वल फलंदाजाला बाद करू शकेल असा तो न खेळता येण्यासारखा चेंडू होता. सामन्यानंतर त्याचीच चर्चा होत राहिली. (IPL 2024, MI vs PBKS)
(हेही वाचा- Central Railway: मध्य रेल्वेवर पायाभूत कामांसाठी दोन दिवसांचा रात्रकालीन विशेष ब्लॉक)
सगळ्यात आधी हा बळी पाहूया,
Simply unplayable Bumrah 🫡🔥#PBKSvMI #TATAIPL #IPLonJioCinema #IPLinHindi | @mipaltan | @Jaspritbumrah93 pic.twitter.com/fGmNlFNIqZ
— JioCinema (@JioCinema) April 18, 2024
रसॉ बाद झाल्यावर पंजाबची अवस्था २ बाद १३ अशी झाली होती. आणि समोर लक्ष्य होतं ते १९४ धावांचं. पुढे पंजाबची अवस्था ६ बाद ७७ अशीही झाली. पण, आशुतोष शर्माने (Ashutosh Sharma) २८ चेंडूंत ६१ धावा करत पंजाबला पुन्हा सामन्यात खेचून आणलं. तो मैदानावर होता तोपर्यंत पंजाबचं पारडं समसमान होतं. पण, १८ व्या षटकात तो बाद झाला आणि पुन्हा एकदा मुंबईचा विजय दृष्टिपथात आला. आणि अखेर मुंबईने ९ धावांनी विजयही मिळवला. (IPL 2024, MI vs PBKS)
(हेही वाचा- DRDO: चांदीपूर येथून स्वदेशी तंत्रज्ञान क्रूझ क्षेपणास्त्राची डीआरडीओकडून यशस्वी चाचणी)
त्या आधी मुंबई इंडियन्सनी ७ बाद १९२ धावा केल्या त्या सुर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) खणखणीत ७८ धावांच्या खेळीमुळे. मुंबई इंडियन्सनी आता ७ सामन्यांतून तिसरा विजय मिळवला आहे. तर पंजाब किंग्ज इलेव्हनचा हा पाचवा पराभव. (IPL 2024, MI vs PBKS)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community