- ऋजुता लुकतुके
भारत आणि पाकिस्तानमधील राजकीय संबंध बिघडलेले असल्यामुळे उभय देशांतील क्रिकेट मालिकाही सध्या बंद आहेत. क्रिकेटच्या मैदानातील हे पारंपरिक प्रतिस्पर्धी असल्यामुळे यापूर्वी अनेक मालिका गाजलेल्या आहेत. पण, ती मजा आता क्रिकेट रसिकांना अनुभवता येत नाही. अशावेळी त्रयस्थ ठिकाणी भारत – पाक (India – Pakistan) कसोटी मालिका झाली तर अशा मालिकेचं स्वागत भारतीय कर्णधार रोहित शर्मानेही केलं आहे. (IPL 2024, Rohit on India-Pak Cricket)
(हेही वाचा- Aryabhata Satellite : भारताचा पहिला उपग्रह ’आर्यभट्ट’ आजच्या दिवशी १९ एप्रिलला झाला होता लॉन्च!)
माजी क्रिकेटपटू ॲडम गिलख्रिस्ट आणि मायकेल वॉन यांच्या पॉडकास्ट कार्यक्रमात रोहितने हे मत व्यक्त केलं. ‘शेवटी लोकांना स्पर्धा बघायला आवडते. भारत – पाक (India – Pakistan) मालिका त्यादृष्टीने नक्की रंगेल,’ असं रोहितने बोलून दाखवलं. आयसीसी स्पर्धांमध्ये भारत – पाक सामने होतातच. आता जर कसोटी मालिका झाल्या तर आणखी उत्तम होईल, असं रोहितचं मत आहे. ‘मी फक्त क्रिकेटच्या दृष्टिकोणातून विचार करत आहे. मला बाकी काही माहीत नाही,’ असं शेवटी रोहित म्हणाला. (IPL 2024, Rohit on India-Pak Cricket)
भारत आणि पाकिस्तान दरम्यानचा शेवटचा कसोटी सामना २००७ मध्ये बंगळुरूच्या चिन्नास्वामी मैदानात झाला होता. रोहितने पाक गोलंदाजीचं कौतुक केलं. ‘पाकिस्तानची गोलंदाजी ही त्यांची खरी ताकद आहे. त्यांच्यासमोर भारतीय फलंदाजांची परीक्षा व्हावी असं मला वाटतं,’ असं रोहित म्हणतो. (IPL 2024, Rohit on India-Pak Cricket)
(हेही वाचा- Maria Yurievna Sharapova: सिंगल टेनिसमध्ये पहिल्या क्रमांकाचं स्थान मिळवणारी पहिली रशियन महिला कोण?)
पाकिस्तानी संघ आयसीसी (ICC) स्पर्धा खेळण्यासाठी भारतात नियमितपणे आलेला आहे. अगदी अलीकडे नोव्हेंबर २०२३ मध्ये पाक संघ आयसीसी एकदिवसीय विश्वचषक खेळण्यासाठी भारता येऊन गेला. पण, आशिया चषकाच्या वेळी भारताने पाकिस्तानमध्ये जाऊन खेळायला नकार दिला. पाकिस्तानमध्ये जाण्यासाठी केंद्रसरकारची परवानगी लागते. आयसीसीही जर देशाच्या सरकारची परवानगी नसेल तर खेळण्याची सक्ती करत नाही. त्यामुळे भारताने पाकिस्तानमध्ये जायला नकार दिल्यावर भारत आणि पाकिस्तान दरम्यानचे सामने श्रीलंकेत खेळवण्यात आले. (IPL 2024, Rohit on India-Pak Cricket)
(हेही वाचा- Lok Sabha Election 2024: नागपूरात इव्हीएम मशीन बंद पडल्याने मतदानाला १ तास १० मिनिटे उशीर!)
अर्थात, भारत – पाक कसोटी मालिका व्हावी की नाही, हा बीसीसीआय (BCCI) आणि केंद्रसरकारचा निर्णय आहे, हे सांगायला रोहीत विसरला नाही. (IPL 2024, Rohit on India-Pak Cricket)
हेही पहा-