Buldhana: बुलढाणा, मध्यप्रदेशच्या सीमावर्ती भागात पोलिसांची मोठी कारवाई; चार पिस्तुलसह जिवंत काडतुसे जप्त

163

बुलढाणा (Buldhana) व मध्यप्रदेश राज्याच्या सीमावर्ती भागात पोलिसांनी केलेल्या मोठ्या कारवाईत ४ पिस्तुल, १७ जिवंत काडतुसे, दुचाकी वाहन, मोबाईल असा २ लाख १७ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी चौघांना ताब्यात घेतले असुन त्यांची चौकशी सुरू आहे. (Buldhana)

(हेही वाचा –Loksabha Election 2024 : आधी मतदान, मगच लग्न.. नवरदेवाने बजावला मतदानाचा हक्क)

ते मध्यप्रदेश चे रहिवासी असल्याचे समजते आहे. भारसिंग मिसऱ्या खिराडेव, हिरचंद गुमानदेव उचवार, आकाश मुरलीधर मेश्राम, संदीप डोंगरे अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध शस्त्र कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार चंद्रकांत पाटील, सहकारी विनोद शिंबरे, विशाल गवई, मोईनुध्धीन सैय्यद, राहुल पवार, गणेश मोरखडे यांनी ही कारवाई केली. (Buldhana)

हे पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.