Lok Sabha Election 2024: मतदान करणाऱ्यांना टाटा एअरलाइन्सची विशेष ऑफर, सवलतीचा फायदा कसा घ्याल?

कंपनी १९व्या वर्धापन दिनाच्या तयारीत आहे. अशा वातावरणात कंपनीने आपला खास उपक्रम मोहीम सुरू केली आहे.

230
Lok Sabha Election 2024: मतदान करणाऱ्यांना टाटा एअरलाइन्सची विशेष ऑफर, सवलतीचा फायदा कसा घ्याल?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान शुक्रवार, (१९ एप्रिल) सुरू झाले. दरम्यान एअर इंडिया एक्सप्रेसने मतदानाचा प्रचार करण्यासाठी मोठी घोषणा केली आहे.

एअरलाइन प्रथमच १८ ते २२ वर्षे वय असलेल्या मतदारांना विशेष सवलत देणार आहे. जे लोक पहिल्यांदा मतदान करण्यासाठी त्यांच्या घरी जात आहेत. त्यांना विमान तिकिटावर १९ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. मतदानाबाबत लोकांमध्ये जागरूक निर्माण व्हावी, यासाठी एअर इंडिया एक्सप्रेसने #VoteAsYouAre ही विशेष मोहीम सुरू केल्याची घोषणा केली आहे. या मोहिमेअंतर्गत एअरलाइन्स १८ ते २२ वर्षे वयोगटातील तरुणांना सवलत देणार आहे.

(हेही वाचा – Manipur Lok Sabha Elections : मणिपूरमध्ये मतदानाला गालबोट; गोळीबारात 3 जखमी, EVM तोडले )

एअर इंडिया एक्स्प्रेसचे सीईओ अंकुर गर्ग म्हणतात की, एअर इंडिया एक्सप्रेसने नेहमीच समाजातील बदलासाठी काम केले आहे. कंपनी १९व्या वर्धापन दिनाच्या तयारीत आहे. अशा वातावरणात कंपनीने आपला खास उपक्रम #VoteAsYouAre मोहीम सुरू केली आहे.

सवलतीच्या तिकिटांचे बुकिंग करण्यासाठी…
कंपनीने याविषयीचे निवेदन त्यांच्या अधिकृत ‘X’समाजमाध्यमाद्वारे प्रसिद्ध केले आहे. या निवेदनात कंपनीने लिहिले आहे की, मतदाराला संबंधित मतदारसंघाच्या जवळच्या विमानतळावर जाण्यासाठी ही सूट मिळेल. ही सूट १८ एप्रिल ते १ जून २०२४या कालावधीतच उपलब्ध असेल. सवलतीच्या तिकिटांचे बुकिंग एअरलाइनचे मोबाइल अॅप आणि संकेतस्थळ https://www.airindiaexpress.com द्वारे केले जाऊ शकते.

ऑफरसाठी मिळण्यासाठी काय कराल?

एअर इंडिया एक्सप्रेसच्या या ऑफरचा लाभ घेण्यासाठी, ग्राउंड स्टाफला तुमचे मतदार ओळखपत्र दाखवणे आवश्यक आहे. विमानतळावर बोर्डिंग पास घेताना ग्राहकांना त्यांचे मतदार ओळखपत्र दाखवावे लागेल.

कंपनीची सेवा कुठे आणि किती स्थळांसाठी ?
टाटा समूहाची विमान वाहतूक कंपनी एअर इंडिया एक्स्प्रेस भारतातील ३१ स्थळांसाठी उड्डाण करते. यामध्ये पंजाबचे अमृतसर, उत्तर प्रदेशचे अयोध्या, दिल्ली, गोवा, गुवाहाटी, ग्वाल्हेर, हैदराबाद, मणिपूरचे इंफाळ, इंदूर, मध्य प्रदेशचे जयपूर, केरळचे कन्नूर, कोची आणि कोझिकोड, कोलकाता, लखनौ, श्रीनगर, रांची, पुणे, मुंबई, वाराणसी आदींचा समावेश आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.