Lok Sabha Election 2024 : ईशान्येकडील २५ जागांवर चुरशीची लढत !

केंद्रीय मंत्री आणि डिब्रूगडहून भाजपाचे उमेदवार सर्बानंद सोनोवाल यांचा सामना असम जातीय परिषदेचे अध्यक्ष लुरिनज्योती गोगोई यांच्यासोबत होणार आहे. भाजपाचे काजीरंगाहून उमेदवार कामाख्याप्रसाद तासा आणि जोरहाटहून कॉंग्रेसचे गौरव गोगोई हे तिन्ही खासदार मैदानात आहेत.

180
Lok Sabha Elections 2024 : नवीन लोकसभेतील ५४३ पैकी ५०३ खासदार कोट्यधीश
  • वंदना बर्वे

ईशान्येकडील (North East) ८ राज्यांतील २५ जागांवर तीन टप्प्यात निवडणूक होत आहे. यातील १४ जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान होत आहे. दुसऱ्या टप्प्यात ७ जागांवर आणि तिसऱ्या टप्प्यात चार जागांवर निवडणूक होत आहे. पहिल्या टप्प्यात आसाममधील ५, मणिपूर, त्रिपुरा, मिझोरम, नागालॅंड आणि सिक्कीमधील प्रत्येकी एका जागेवर मतदान होत आहे. तर, अरुणाचल प्रदेश आणि मेघालयातील सर्व अर्थात २-२ जागांवर निवडणूक होत आहे. (Lok Sabha Election 2024)

आसाममध्ये पहिल्या टप्प्यात होणाऱ्या ५ जागांसाठी शेतकऱ्यांपासून ते व्यापारी आणि सेवानिवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांपासून गृहिणींपर्यंत सर्व जण निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. केंद्रीय मंत्री आणि डिब्रूगडहून भाजपाचे (BJP) उमेदवार सर्बानंद सोनोवाल यांचा सामना असम जातीय परिषदेचे अध्यक्ष लुरिनज्योती गोगोई यांच्यासोबत होणार आहे. भाजपाचे काजीरंगाहून उमेदवार कामाख्याप्रसाद तासा आणि जोरहाटहून कॉंग्रेसचे गौरव गोगोई हे तिन्ही खासदार मैदानात आहेत. भाजपाने आमदार रंजीत दत्ता यांना सोनितपूरमधून उमेदवारी दिली आहे. (Lok Sabha Election 2024)

आसाम

आसाममध्ये बिहूच्या तयारीसोबतच लोकसभा निवडणुकीच्या तयारीमुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. नॉर्थ ईस्टमधील ८ राज्यांतील २५ जागांपैकी १४ जागा याच आसाम राज्यात आहेत. यामुळे भाजपासह कॉंग्रेसने आपले लक्ष्य येथे जास्त प्रमाणात केंद्रित केले आहे. मागच्या निवडणुकीत भाजपाला या भागातून १८ जागा मिळाल्या होत्या. (Lok Sabha Election 2024)

मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यामुळे कॉंग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांना थोडा त्रास सहन करावा लागत आहे. त्यांचा कालियाबोर हा मतदारसंघच आता संपुष्टात आला आहे. यामुळे गोगोई यांना आता जोरहाटमधून मैदानात उतरावे लागले आहे. सिलचर एससीसाठी राखीव आहे. तेजपूरचे नाव सोनितपूर असे करण्यात आले आहे. गुवाहाटीमध्ये भाजपा आधीच मजबूत होता, इतर जागांवरही त्यांची ताकद वाढली आहे. केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांना दिब्रुगडमध्ये कोणतीही अडचण नाही. मात्र तरीही राज्याच्या राजकारणात बद्रुद्दीन अजमल यांचा प्रभाव कायम आहे. (Lok Sabha Election 2024)

मणिपूर

मणिपूरमध्ये आउटर मणिपूर आणि इनर मणिपूर अशा लोकसभेच्या २ जागा आहेत. यातील १ जागा भाजपाच्या ताब्यात आहे, तर १ जागा एनपीएफच्या ताब्यात आहे. येथे १९एप्रिलला मतदान होत आहे. महत्त्वाचा मुद्या म्हणजे, ३ मे २०२३ला सुरू झालेल्या मैतेई आणि कुकी समुदायांमधील हिंसक संघर्षाने ईशान्येत भाजपासमोर आव्हान उभे केले आहे. (Lok Sabha Election 2024)

मेघालय

मेघालयातील शिलॉंग आणि तुरा या लोकसभेच्या दोन्ही जागांवर १९ एप्रिलला निवडणूक होणे आहे. रालोआने मुख्यमंत्री संगमा यांच्याकडे कमान सोपविली आहे. दोन्ही जागा आपल्या ताब्यात करण्यासाठी नॅशनल पीपल्स पार्टी (NPP), काँग्रेस, व्हॉइस ऑफ पीपल पार्टी, युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टी आणि हिल स्टेट पीपल डेमोक्रॅटिक पार्टी मैदानात आहे. (Lok Sabha Election 2024)

भाजपाने या जागा एनपीपीला दिल्या असून एनपीपीने दोन्ही जागांवर महिला उमेदवार उतरविल्या आहेत. लोकसभेचे माजी अध्यक्ष पीए संगमा यांची पारंपरिक जागा म्हणजे तुरा. १९९१ पासून या जागेवर संगमा कुटुंबाचा ताबा आहे. सध्या खासदार कन्या अगाथा संगमा पुन्हा नशीब आजमावत आहेत. मागील निवडणुकीत अगाथा यांनी माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा यांना पराभूत केले आहे. (Lok Sabha Election 2024)

अरुणाचल प्रदेश

अरुणाचल प्रदेशात पूर्व आणि पश्चिम अशा दोन जागा आहेत. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आणि तापीर गाओ हे भाजपाचे विद्यमान खासदार आहेत. यावेळी दोघेही उमेदवार आहेत. रिजिजू यांचा सामना काँग्रेसच्या नबाम तुकीशी, तर गाओ यांचा सामना काँग्रेसच्या बोसीराम सिरम यांच्याशी होणार आहे. विधानसभेच्या निवडणुकाही येथे एकाचवेळी होत असून, त्यात भाजपाने आधीच १० जागा बिनविरोध जिंकल्या आहेत. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Rahul Shewale यांनी घेतली राज ठाकरे यांची सदिच्छा भेट)

नागालँड

येथे लोकसभेची एकमेव जागा असून भाजपाच्या मित्रपक्ष नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीकडे आहे. एनडीपीपीकडून डॉ. चुंबेन मुरी आणि काँग्रेसकडून एसएस जमीर आपले नशीब आजमावत आहेत. (Lok Sabha Election 2024)

मिझोरम

मिझोराम पीपल्स मूव्हमेंट या नवीन आणि सत्ताधारी पक्षाने जोरदार उपस्थिती लावली आहे. या पक्षाने विधानसभा निवडणुकीत मिझो नॅशनल फ्रंटचा पराभव केला होता. (Lok Sabha Election 2024)

सिक्कीम

सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाकडे एकमेव जागा आहे. मोर्चाचे इंद्र हंग सुब्बा पुन्हा उमेदवार आहेत. त्यांचा सामना भाजपाचे दिनेशचंद्र नेपाळ आणि सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंटच्या उमेदवाराशी होणार आहे. येथेही विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. (Lok Sabha Election 2024)

त्रिपुरा

त्रिपुरा येथे लोकसभेच्या दोन जागा आहेत. २०१९मध्ये दोन्ही जागा भाजपाच्या खात्यात गेल्या. यावेळी त्याला प्रमुख विरोधी पक्ष टिपरा मोथा पक्षाचा पाठिंबा आहे. याचे नेतृत्व त्रिपुराच्या माजी राजघराण्याचे प्रमुख प्रद्योत बिक्रम माणिक्य देबबर्मा करत आहेत. काँग्रेस आणि माकपची आघाडी आहे. दोघेही प्रत्येकी एक जागा वाटून भाजपाला आव्हान दिले आहे. भाजपाने माजी मुख्यमंत्री विप्लव देब आणि माजी महाराणी कृती सिंह देबबरमा यांना उमेदवारी दिली आहे. (Lok Sabha Election 2024)

भाजपाने दोन दशकांत ईशान्येकडील राज्यात आपले वर्चस्व वाढविले आहे. २००४ आणि २००९ मध्ये पक्षाचे ४ खासदार असताना २०१४ मध्ये ते दुप्पट झाले आणि २०१९ मध्ये १४वर पोहोचले. रालोआ खासदारांची संख्यासुद्धा १८वर पोहोचली आहे. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.