Lok Sabha Election 2024 : माढ्यात महाविकास आघाडीला मोठा धक्का

अनिकेत देशमुख यांच्या अपक्ष उमेदवारीने कोणाला होणार फायदा?

294
Lok Sabha Election 2024 : माढ्यात महाविकास आघाडीला मोठा धक्का

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता राज्यात मोठ्या राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. यातच माढा लोकसभेतून महाविकास आघाडीकडून धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी दिली आहे. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज देखील भरला आहे. तर महाविकास आघाडीत असलेल्या शेकापचे नेते अनिकेत देशमुख (Aniket Deshmukh) यांनी देखील अपक्ष अर्ज भरला आहे. त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटलांना मोठा धक्का बसला आहे. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Narayan Rane : भव्य शक्तिप्रदर्शन करत नारायण राणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल…)

अनिकेत देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली…

धैर्यशील मोहिते पाटलांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी दिल्यानंतर शेकापचे अनिकेत देशमुख (Aniket Deshmukh) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत ते म्हणाले की, चर्चेला आम्ही पाठिंबा दिला हे म्हणणं योग्य राहणार नाही. आम्ही दुधखुळे नाहीत. माढा मतदारसंघातील या सर्व घडामोडीत आमचा वापर करण्यात आला असं माझी स्पष्ट भूमिका आहे. प्रत्येकवेळी एकंदरीत सगळ्यांना अंधारात ठेवून या गोष्टी घडल्या आहेत. हा आमच्यासाठी राजकारणातील धडा आहे. यापुढे अशी चुक होणार नाहीत. असंही अनिकेत देशमुख यांनी म्हटलं. (Lok Sabha Election 2024)

तसेच महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) असल्याने आम्हाला तुमच्याबद्दल चर्चा करायची आहे. असं सांगितले, तेव्हा आम्ही माढ्यातील बैठकीत गेलो. त्या चर्चेत आम्हाला सांगितले एक आणि बैठकीते दुसरेच ठरले. त्यामुळे आता कार्यकर्त्यांशी बोलून चर्चा करूने सर्वांचं एकमत झाल्यास उद्या सकाळी आम्ही अर्ज भरणार असल्याचंही देशमुख यांनी म्हटलंय. शेकापचे असून धनगर मतांवर प्रभाव टाकणारे अनिकेत हे नेते असल्यामुळे त्याचा थेट फायदा रणजीत निंबाळकर यांना नक्कीच होईल. त्यामुळेच काल उशिरा रात्री शरद पवार यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला आहे. (Lok Sabha Election 2024)

दिवंगत आमदार गणपत देशमुख यांचे नातू असलेले अनिकेत देशमुख हे शेकापचे युवा नेते आहेत. २०१९ च्या सांगोला विधानसभेतून अनिकेत यांचा अवघ्या ७०० मतांनी पराभव केला होता. यातच आता अनिकेत देशमुखांनी (Aniket Deshmukh) लोकसभा निवडणुक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. तर माढा मतदारसंघ आपल्याला सोडावा अशी मागणी शेकापचे आमदार जयंत पाटील यांनीही केली होती. मात्र शरद पवारांनी धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी दिल्याने शेकापच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येत आहे. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.