Chhagan Bhujbal : लोकसभा निवडणुकीतून छगन भुजबळांची माघार; पत्रकार परिषद घेऊन केली घोषणा

Chhagan Bhujbal : महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर होऊन त्यांनी प्रचाराचा एक टप्पा पूर्ण केला आहे. महाविकास आघाडीच्या चर्चेतून नाशिकचा प्रश्न सुटला नाही. यामुळे मी माघार घेत आहे, असे छगन भुजबळ यांनी घोषित केले आहे.

210
Ghatkopar Hoarding Collapse : भुजबळ यांची वेगळी चूल?

लोकसभेसाठी पहिल्या टप्प्याचे मतदान पार पडले असले, तरी काही जागांसाठी उमेदवारांची घोषणा अद्याप झालेली नाही. यंदा शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप असे अनेक पक्ष सत्तेत असल्याने कोणत्या जागेवर कोणत्या पक्षाचा उमेदवार उभा करावा, हे ठरवतांना पक्षश्रेष्ठींची दमछाक झाली आहे. नाशिक (Nashik Lok Sabha constituency) येथील जागेचा तिढाही अद्याप सुटलेला नाही. त्यासाठी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पत्रकार परिषद घेऊन या ठिकाणाहून माघार घेत असल्याचे सांगितले.

(हेही वाचा – Israel Iran War: इस्रायल-इराण युद्धावर काय म्हणाले एलॉन मस्क ?)

महाविकास आघाडीचा प्रचाराचा एक टप्पा पूर्ण

नाशिकच्या जागेसोबत अमित शाह (Amit Shah) यांच्यासोबत चर्चा झाली. अमित शाह यांनी नाशिकची जागा लढवण्याचे मला सांगितले. त्या वेळी ही जागा शिवसेनेकडे असल्याचे आम्ही सांगितले. त्यानंतर अमित शाह म्हणाले की, आम्ही एकनाथ शिंदे यांच्याशी याबाबत बोलू. त्यानंतर मी काम सुरु केले. नाशिकमध्ये येऊन विविध घटकांशी चर्चा सुरु केली. मराठा समाज, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्यांक विविध घटकांनी मला पाठिंबा दिला. यानंतर तीन आठवडे झाले आहेत. आता महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर होऊन त्यांनी प्रचाराचा एक टप्पा पूर्ण केला आहे. महाविकास आघाडीच्या चर्चेतून नाशिकचा प्रश्न सुटला नाही. यामुळे मी माघार घेत आहे, असे छगन भुजबळ यांनी घोषित केले आहे.

तातडीने निर्णय घ्या

नाशिकच्या जागेसाठी अजित पवार यांनी समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांचे नाव सुचवले होते. भाजप नेतृत्वाने मलाच निवडणूक लढवण्याचे सांगितले. मी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा केली. त्यांनीही तेच सांगितले. देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा निरोप आहे, तुम्हाला लढवावे लागणार आहे, असे त्यांनी सांगितल्याचे छगन भुजबळ म्हणाले. आता मी माघार घेत आहे. यामुळे या ठिकाणी तातडीने निर्णय घेतला पाहिजे. उगीच अडचण निर्माण होईल, असे होऊ नये, असे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी म्हटले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.