Pak vs NZ T20 Series : पावसापासून संरक्षणासाठी पाकमधील स्टेडिअमवर प्लास्टिक शिटचा वापर

Pak vs NZ T20 Series : पाकिस्तानच्या क्रिकेट मैदानांवर पावसापासून संरक्षणाचीही सोय नसल्याचं समोर आलं आहे. 

178
Pak vs NZ T20 Series : पावसापासून संरक्षणासाठी पाकमधील स्टेडिअमवर प्लास्टिक शिटचा वापर
  • ऋजुता लुकतुके

न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान (Pak vs NZ) ही आंतरराष्ट्रीय मालिका सध्या पाकिस्तानमध्ये सुरू आहे. मालिकेतील पहिल्याच टी-२० सामन्यादरम्यान (T20 Series) रावळपिंडी इथं जोरदार पाऊस पडला. फक्त दोन चेंडूंनंतर हा सामना रद्द करावा लागला. पण, हे सगळं सुरू असताना प्रेक्षकांच्या झालेल्या हालाकडे कुणाचंच लक्ष नव्हतं. कारण, प्रेक्षकांच्या आसनव्यवस्थेवर छप्परच नसल्यामुळे प्रेक्षक पावसाचा मारा अखंड झेलत होते. (Pak vs NZ T20 Series)

आणि मुसळधार पाऊस सुरू झाला तेव्हा अखेर काही प्रेक्षकांनी मोठ्या प्लास्टिक शिट्सचा आसरा घेतला. या सगळ्या प्रकाराचा व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. स्टेडिअममधील खुर्च्यावरही कापडी आवरण असल्यामुळे त्याही खराब झालेल्या दिसल्या. (Pak vs NZ T20 Series)

(हेही वाचा – Chhagan Bhujbal : लोकसभा निवडणुकीतून छगन भुजबळांची माघार; पत्रकार परिषद घेऊन केली घोषणा)

उद्भवलेली परिस्थिती लाजिरवाणी – पाक चाहते 

पाकिस्तान पुढील वर्षी चॅम्पियन्स करंडक स्पर्धा भरवणार आहे. अशावेळी आता उद्भवलेली परिस्थिती ही लाजिरवाणी असल्याचं पाक चाहतेच सोशल मीडियावर लिहित आहेत. पहिल्या टी-२० सामन्यांत (T20 Series) फक्त दोनच चेंडूंचा खेळ झाला. पाकिस्तानचा तेज गोलंदाज मोहम्मद आमिर या मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे. जवळ जवळ ४ वर्षं तो क्रिकेटपासून दूर आहे. २०१० मध्ये आमीरवर मॅच-फिक्सिंगचा आरोप झाला होता. त्यानंतरही तो क्रिकेटमध्ये सक्रिय होता. पण, डिसेंबर २०२० मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली. (Pak vs NZ T20 Series)

अलीकडेच त्याने आपला विचार बदलला आहे. ३२ वर्षीय आमीरसाठी तंदुरुस्ती आणि गोलंदाजीतील जुना विखार दाखवून देण्याची ही एक संधी असेल. (Pak vs NZ T20 Series)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.