RBI Penalty on Banks : रिझर्व्ह बँकेचा ६ सहकारी बँकांना ६० लाखांचा दंड

RBI Penalty on Banks : मध्यवर्ती बँकेचे नियम न पाळल्यामुळे या बँकांवर ही कारवाई झाली आहे. 

191
Repo Rate : २०२५ पर्यंत रेपो दरात कपातीची शक्यता नाहीच
  • ऋजुता लुकतुके

रिझर्व्ह बँकेनं (Reserve Bank) उत्तर भारतातील ५ सहकारी बँकांना मिळून ६० लाख १४ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. बँकिंगचे काही नियम न पाळल्यामुळे ही कारवाई मध्यवर्ती बँकेनं केली आहे. यातील ४०.३० लाखांचा दंड एकट्या राजकोट सहकारी बँकेला झाला आहे. कर्ज देण्याची परवानगी नसताना त्यांनी बेकायदेशीर कर्ज दिल्यामुळे ही कारवाई झाली आहे. या बँकेनं संचालक मंडळातील व्यक्तींच्या नातेवाईकांना कर्जवाटप केलं होतं. आणि हे रिझर्व्ह बँकेच्या नियमात बसत नाही. (RBI Penalty on Banks)

तर नवी दिल्लीतील कांग्रा सहकारी बँक, लखनौमधील राजधानी नगर सहकारी बँक आणि उत्तराखंड मधील गढवाल जिल्हा सहकारी बँक यांनाही प्रत्येकी ५ लाखांचा दंड ठोठावला आहे. तर डेहराडूनच्या जिल्हा सहकारी बँकेलाही २ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. बँकिंगचे नियम आणि बँकेचा ग्राहकांबरोबर असलेला करार न पाळणं या चुकांसाठी हे दंड झाले असल्याचं रिझर्व्ह बँकेनं (Reserve Bank) कळवलं आहे. (RBI Penalty on Banks)

(हेही वाचा – Navneet Rana: “सीतेला पण भोग चुकले नाही, आपण तर..” राऊतांच्या टीकेवर नवनीत राणांचा घणाघात)

या पाचही बँकांच्या वार्षिक ताळेबंदात अनियमितता आणि त्रुटी आढळल्यामुळे मध्यवर्ती बँकेनं त्याची चौकशी सुरू केली होती. अधिकारी वर्ग आणि संबंधित ग्राहकांचा जबाब नोंदवल्यानंतर रिझर्व्ह बँकेनं (Reserve Bank) ही कारवाई केली आहे. (RBI Penalty on Banks)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.