Indian Economy : जागतिक अनिश्चितता सहन करण्यासाठी भारतीय अर्थव्यवस्था तयार

Indian Economy : इस्त्रायल, इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी भारतीय अर्थव्यवस्थेविषयी मोठं भाष्य केलं आहे. 

177
Property Indexation : मालमत्ता विक्रीवर भांडवली नफा कर भरताना केंद्र सरकारचे आता दोन पर्याय
  • ऋजुता लुकतुके

इस्त्रायल-इराण संघर्षामुळे (Israel-Iran conflict) उद्भवणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारताची अर्थव्यवस्था तयार आहे, असं वक्तव्य अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलं आहे. यंत्रणांना हाय अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. आणि गरज पडल्यास आवश्यक पावलं उचलण्यासाठी आम्ही तयार आहोत, असं सीतारमण यांनी म्हटलं आहे. (Indian Economy)

‘पुढे काय वाढून ठेवलं आहे, याची आताच कल्पना नाही. पण, जशी परिस्थिती समोर असेल त्यानुसार पावलं उचललण्यासाठी आम्ही सज्ज आहोत,’ असं त्या सीएनबीसी वाहिनीवरील मुलाखतीत म्हणाल्या. युद्धाचा भारतावर सगळ्यात मोठा परिणाम होणार आहे तो तेलाच्या किमती वाढल्यामुळे. कारण भारत जगातील तिसऱ्या क्रमांकावरील सगळ्यात मोठा तेल आयातदार देश आहे. भारतातील गरजेपैकी ८५ टक्के तेल आपण आयात करतो आणि युद्धजन्य परिस्थितीत आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती वाढतात. (Indian Economy)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : ईशान्येकडील २५ जागांवर चुरशीची लढत !)

आणि ते आयात करण्यासाठी देशाची परकीय गंगाजळी (Foreign Reserves) खर्च होत असते. त्यामुळे मागच्या काही आठवड्यात भारताने परकीय गंगाजळी वाढवण्यावर लक्ष केंद्रीत केलं आहे. ‘तेलावर आपल्याकडचे डॉलर खर्च होऊ नयेत यासाठी आपण रशियाकडून तेल आयात करायला सुरुवात केली आहे. ते प्रमाण येत्या वर्षांमध्येही कायम राहील. त्यामुळे आपले बरेच डॉलर वाचतात,’ असं सीतारमण यावेळी म्हणाल्या. अशा प्रत्येक संकटाच्या वेळी संबंधित केंद्रीय विभागांशी चर्चा करून योग्य ते निर्णय घेतले जातील, असं अर्थमंत्र्यांचं म्हणणं आहे. (Indian Economy)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.