Milind Deora : वर्षा गायकवाड दलित असल्याने त्यांना तिकीट देण्यास उद्धव ठाकरेंचा विरोध

देवरा यांनी एक्स समाज माध्यमावर पोस्ट करत दावा केला की, वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिल्यास त्यांना अन्य जातीची आणि धर्माची मते मिळणार नाहीत, असे उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेत्यांना सुचविले होते, त्यामुळे त्यांना लोकसभेची उमेदवारी नाकारण्यात आली.

185
Milind Deora: उद्धव ठाकरेंमुळे मला पक्ष सोडावा लागला, मिलिंद देवरा यांनी असा आरोप का केला?

मुंबई विभागीय काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) दलित असल्याने शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव यांचा त्यांना दक्षिण मध्य मुंबईतून उमेदवारी देण्यास विरोध होता, असा आरोप शिवसेनेचे खासदार मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी केला. (Milind Deora)

देवरा यांनी एक्स समाज माध्यमावर पोस्ट करत दावा केला की, वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिल्यास त्यांना अन्य जातीची आणि धर्माची मते मिळणार नाहीत, असे उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेत्यांना सुचविले होते, त्यामुळे त्यांना लोकसभेची उमेदवारी नाकारण्यात आली. (Milind Deora)


(हेही वाचा – RBI Penalty on Banks : रिझर्व्ह बँकेचा ६ सहकारी बँकांना ६० लाखांचा दंड)

उबाठा शिवसेना गटाने लोकसभा निवडणुकीच्या २१ जागा लढविण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यांनी फक्त एकच दलित उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवला आहे. या उलट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी तीन दलित उमेदवारांना संधी दिली आहे. निवडणुकीत दलित समाजाची मते हवीत, पण या समाजाला नेतृत्वाची संधी द्यायची नाही, अशी दुटप्पी भूमिका उबाठा गटाची दिसून येते, अशी टीका मिलिंद देवरा यांनी केली. (Milind Deora)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.