सरकारने उचलली पावले; Sonia Gandhi लपवत असलेली Jawaharlal Nehru यांच्या खाजगी जीवनातील रहस्ये होणार उघड ?

Sonia Gandhi यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात नेलेल्या कागदपत्रांमध्ये नेमका काय तपशील आहे, याची चर्चा चालू आहे. Jawaharlal Nehru यांच्या खाजगी जीवनातील कोणती रहस्ये उघड होऊ नयेत, याची गांधी घराणे काळजी घेत आहे, असा प्रश्नही या ठिकाणी उपस्थित होतो.

321
सरकारने उचलली पावले; Sonia Gandhi लपवत असलेली Jawaharlal Nehru यांच्या खाजगी जीवनातील रहस्ये होणार उघड ?
सरकारने उचलली पावले; Sonia Gandhi लपवत असलेली Jawaharlal Nehru यांच्या खाजगी जीवनातील रहस्ये होणार उघड ?

पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय (पीएमएमएल, PMML) पूर्वी नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी (एनएमएमएल, NMML) हे देशातील सर्वांत मोठे संग्रहालय आहे. या संग्रहालयात १००० हून अधिक महत्त्वपूर्ण नेते आणि मान्यवर यांचे दस्तावेज संग्रहित करण्यात आले आहेत. या संग्रहालयात असलेल्या पंतप्रधान नेहरूंच्या (Jawaharlal Nehru) कागदपत्रांपैकी ५१ पेट्या भरून कागदपत्रे सोनिया गांधी यांनी काढून घेतली आहेत. ही कागदपत्रे १९७१ मध्ये इंदिरा गांधी आणि नंतर सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनीच संग्रहालयाला दान केली होती. आता सरकार ही कागदपत्रे परत मिळवण्यासाठी प्रयत्न करत असून त्यासाठी कायदेशीर चाचपणी करण्यात येत आहे.

सोनिया गांधी यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात नेलेल्या कागदपत्रांमध्ये नेमका काय तपशील आहे, याची चर्चा चालू आहे. नेहरूंच्या खाजगी जीवनातील कोणती रहस्ये उघड होऊ नयेत, यासाठी गांधी घराणे धडपड करत आहे, असा प्रश्नही या ठिकाणी उपस्थित होतो.

(हेही वाचा – Navneet Rana: “सीतेला पण भोग चुकले नाही, आपण तर..” राऊतांच्या टीकेवर नवनीत राणांचा घणाघात)

सोनिया गांधींकडून कागदपत्रे परत मिळवणार ?

फेब्रुवारी २०२४ मध्ये संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पीएमएमएलची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या वेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान हेही उपस्थित होते. 13 फेब्रुवारी 2024 रोजी या सर्वांच्या उपस्थितीत झालेल्या या एजीएममध्ये सोनिया गांधी यांनी नेलेल्या खासगी कागदपत्रांचा काही भाग परत मिळवण्याच्या मुद्द्यावर तपशीलवार चर्चा झाली, असे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे.

काय आहे प्रकरण ?

मार्च 2008 मध्ये सोनिया गांधींच्या वतीने एम. व्ही. राजन यांनी नेहरूंच्या संग्रहातील खाजगी कागदपत्रे आणि अधिकृत कागदपत्रे वेगळी करण्यासाठी पीएमएमएलला भेट दिली होती. त्यांनी ओळख पटवलेली नेहरूंची कागदपत्रे 5 मे 2008 रोजी 51 पेट्यांमध्ये सोनिया गांधींना पाठवण्यात आली. सोनिया गांधी यांनी परत मिळवलेल्या कागदपत्रांमध्ये नेहरू आणि जयप्रकाश नारायण, एडविना माउंटबॅटन (Edwina Mountbatten), अल्बर्ट आईन्स्टाईन, अरुणा आसफ अली, विजया लक्ष्मी पंडित आणि जगजीवन राम यांच्यात झालेल्या पत्रांच्या देवाणघेवाणीचा समावेश आहे.

त्या वेळी या प्रकरणाची अंतर्गत चौकशी करण्यात आली होती, असे फेब्रुवारीमध्ये झालेल्या बैठकीत सांगण्यात आले. त्यानंतर कागदपत्रांची मालकी, संरक्षकता, कॉपीराइट आणि या अभिलेखीय संग्रहांचा वापर यांसारख्या मुद्द्यांवर कायदेशीर मत जाणून घेण्याविषयी एकमत झाले.

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: ईव्हीएम मशीनद्वारे केलेले मतदान १०० टक्के सुरक्षित, निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिले मतदारांना आश्वासन)

भेट नव्हे, केवळ सुरक्षेसाठी ठेवली कागदपत्रे

एन.एम.एम.एल.ने दिलेल्या माहितीनुसार नेहरूंच्या (Jawaharlal Nehru) कागदपत्रांचा संच हा संग्रहालयाने मिळवलेला खाजगी कागदपत्रांच्या संकलनाचा पहिला संच होता. नेहरूंच्या कायदेशीर वारसदार इंदिरा गांधी यांच्या वतीने ही कागदपत्रे देण्यात आली होती. इंदिरा गांधी 1984 मध्ये त्यांच्या मृत्यूपर्यंत या कागदपत्रांच्या मालक होत्या. इंदिरा गांधी यांच्या आदेशानुसार ही कागदपत्रे संग्रहालयाला भेट दिलेली नव्हती, तर सुरक्षित ठेवण्यासाठी होती. त्यामुळे ती इंदिरा गांधींच्या परवानगीशिवाय उघडली जाऊ शकत नव्हती. इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर सोनिया गांधी या इंदिरा गांधींच्या कायदेशीर वारसदारांच्या विश्वस्त-संरक्षक होत्या.

1946 नंतरच्या काळातील नेहरूंच्या कागदपत्रांचा एक मोठा संग्रह सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनीदेखील पीएमएमएलकडे सुपूर्द केला आहे. ही कागदपत्रेही केवळ सुरक्षित कोठडीसाठी जमा करण्यात आल्याचे नंतर सांगण्यात आले. नेहरूंच्या खासगी कागदपत्रांची मालकी, संरक्षण आणि कॉपीराइट यावर कायदेशीर मत जाणून घेण्यासाठी संग्रहालयाने केलेल्या ईमेलला सोनिया गांधी यांच्या कार्यालयाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.