Baramati Lok Sabha Constituency : सुप्रिया यांच्याकडे ५.५ कोटींचे सोने, चांदी, हिरे, सुनेत्रा पवारांकडे किती?

अगोदर सुप्रिया सुळे यांच्या मालकीचे सोने-चांदी बघू. सुप्रिया यांच्या नावावर १९२७.६६० ग्रॅम सोने असून त्याची किंमत रु. १,०१,१६,०१८ (१.०१ कोटी) इतकी आहे. तर चांदी: ६,७४२.१०० ग्रॅम रु. ४,५३,४४६ (४.५३ लाख) आणि हिरेः ७९३.७०३ cas रु. १,५६,०६,३२१ (१.५६ कोटी) अशी एकूण किंमत रु. २,६१,७५,७८५ (२.६१ कोटी) आहे.

225
Baramati Lok Sabha Constituency : सुप्रिया यांच्याकडे ५.५ कोटींचे सोने, चांदी, हिरे, सुनेत्रा पवारांकडे किती?

बारामतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शप) गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे यांच्याकडे एकूण साडेपाच कोटी रुपये किमतीचे सोने, चांदी आणि हिरे आहेत. ही माहिती त्यांनी निवडणूक प्रतिज्ञा पत्रात उघड केली आहे. तर मग अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा यांच्याकडे किती किमतीचे सोने चांदी हिरे आहेत? असा प्रश्न नक्कीच पडेल. (Baramati Lok Sabha Constituency)

सुळे पती-पत्नीकडे ४ किलो सोने

अगोदर सुप्रिया सुळे यांच्या मालकीचे सोने-चांदी बघू. सुप्रिया यांच्या नावावर १९२७.६६० ग्रॅम सोने असून त्याची किंमत रु. १,०१,१६,०१८ (१.०१ कोटी) इतकी आहे. तर चांदी: ६,७४२.१०० ग्रॅम रु. ४,५३,४४६ (४.५३ लाख) आणि हिरेः ७९३.७०३ cas रु. १,५६,०६,३२१ (१.५६ कोटी) अशी एकूण किंमत रु. २,६१,७५,७८५ (२.६१ कोटी) आहे. (Baramati Lok Sabha Constituency)

सुळे यांच्याकडे २.९४ कोटींचा ऐवज

तर सदानंद सुळे यांच्या नावावर सोनेः २१९५.६६ ग्रॅम रु. १,१३,८१,८५५ (१.१३ कोटी), चांदी ३३,७०८ ग्रॅम रु. १७,६२,०७२ (१७.६२ लाख) आणि हिरे : १,०७०.६५ cis रु. १,६२,७४.२५३ (१,६२ कोटी) असा एकूण रु २,९४,१८,१८० (२.९४ कोटी) किमतचा ऐवज आहे. ही माहिती सुप्रिया सुळे यांच्या निवडणूक प्रतिज्ञा पत्रात देण्यात आली आहे. (Baramati Lok Sabha Constituency)

(हेही वाचा – Ratnagiri-Sindhudurg : नारायण राणे यांच्या उमेदवारीमुळे राऊतांच्या उरात धडकी, कोकणी जनता यंदा दाखवणार दादांवर विश्वास)

सुनेत्रावहिनींकडे १ कोटीचे दागिने

अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरल्या असून थेट त्यांच्या नणंद सुप्रिया यांच्या विरोधात आणि सासऱ्यांच्या बालेकिल्ल्यात उभ्या ठाकल्या आहेत. सुनेत्रा यांच्याकडे १०३० ग्रॅमचे सोन्याचे दागिने, ज्याची किंमत रु ५१,८४,०६० (५१.८४ लाख) इतकी आहे तर ३५ किलो ग्रॅम चांदीची भांडी असून त्यांची किंमत रु २४,९९,५५५ (२४.९९ लाख) आणि २८ कॅरेट हिऱ्याचे दागिने असून त्याची किंमत रु २४,५०,९२० (२४.५० लाख) आहे. सुनेत्रा यांच्याकडे एकूण रु १,०१,३४,५३५ (१.०१ कोटी) आहे. (Baramati Lok Sabha Constituency)

अजितदादांची फक्त चांदी

तर अजित पवार यांच्याकडे २१.५० कि ग्रॅम चांदीच्या मुर्त्या असून त्यांची किंमत रु १५,२६, ५०० आणि चांदीच्या २० किलो वजनाच्या रु १४,०७,२९१ (१४.७ लाख) किमतीच्या भेटवस्तू असल्याचे प्रतिज्ञा पत्रात म्हटले आहे. (Baramati Lok Sabha Constituency)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.