- सचिन धानजी,मुंबई
गोरेगाव मुलुंड लिंक रोडवरील महानगरपालिकेच्या हद्दीतील नाहुर रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपुलाचे काम ८० टक्के काम पूर्ण झाले झाले आहे. मात्र, या कामांमध्ये तब्बल अडीच कोटींनी खर्च वाढलेला आहे. या पुलाच्या ठिकाणी असलेली विद्यमान झाडे कापणे तसेच पुनर्रोपित करणे, मलनिःसारण वाहिनी स्थलांतरीत करणे, पादचारी मार्गाऐवजी वाहनांसाठी भुयारी मार्ग बनवणे आदी कामांसाठी खर्चात वाढ झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. (GMLR Nahur Bridge)
मुंबई महापालिकेच्यावतीने गोरेगाव मुलुंड लिंक रोडवर नाहुर रेल्वे मार्गावरील पुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. या पुलाच्या महापालिकेच्या हद्दीतील पोहोच मार्गासाठी कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे. १५ नोव्हेंबर २०१६मध्ये या पुलाच्या बांधकामांसाठी निरज सिमेंट स्ट्रक्चरलर्स लिमिटेड कंपनीची निवड केली होती. हे काम पावसाळा वगळून १८ महिन्यांमध्ये पूर्ण करणे अपेक्षित होते. या कामांसाठी ७२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. हे काम जानेवारी २०१७ रोजी सुरु होणे अपेक्षित होते, परंतु प्रत्यक्षात हे काम नाव्हेंबर २०१८मध्ये सुरु झाले आहे. त्यामुळे हे काम सुरु आहे. नाहुर रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपुलाच्या उतार मार्गाचे विस्तारीकरण व पुनर्बांधणी करण्याच्या कामाचा समावेश होता. त्यानुसार हे काम ८० टक्के पुर्ण झाल्याचा दावा महापालिका पुल विभागाच्यावतीने करण्यात येत आहे. (GMLR Nahur Bridge)
या कामासाठी मूळ कंत्राट किंमत ही ७२ कोटी ३० लाख रुपये एवढी होती, पण आता ही ७४ कोटी ८२ लाख रुपये एवढी झाली आहे. मूळ कामासहित अतिरिक्त काम करणे अत्यावश्यक असल्यामुळे कंत्राट कामात वाढ झाली आहे. या कामात अतिरिक्त बाबींच्या, जादा बाबींसाठी एकूण किंमत १५ कोटी ३७ लाख रुपये एवढे निश्चित केले होते. त्या तुलनेने वाढीव कामाचा खर्च वगळता १० कोटी ५८ लाख रुपयांची बचत होणार आहे, असे पुल विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (GMLR Nahur Bridge)
(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : पहिल्या टप्प्यात सरासरी ६० टक्के मतदान)
या कामांसाठी वाढ असा खर्च
- पुलाच्या जागेवर असलेल्या विविध प्रकारचे झाडे असल्यामुळे ती कापून इतर ठिकाणी स्थलांतर करणे आवश्यक असल्याने…
- या पुलाच्या दक्षिण-पश्चिम बाजूला अस्तित्वात असलेल्या १२०० व १६०० मिली मीटर व्यासाच्या जलवाहिन्या व उत्तर-पश्चिम बाजूला मलनिःसारण वाहिनी स्थलांतर करणे आवश्यक असल्याने…
- या पुलाच्या पश्चिम बाजूस पूर्वी प्रस्तावित केलेल्या पोहोच मार्गाखाली ५ मिटर रुंदीचा पादचारी भुयारी मार्गाऐवजी १५.३५ मिटर रुंदीचा वाहनांना जाण्याकरिता वाहतूक भुयारी मार्ग बनवण्याचा निर्णय घेण्यात आला. या वाहतूक भुयारी मार्गच्याआ भिंतीची उंची ३ मिटर वरुन सरासरी ६.५० मिटर होणार असून रुंदी मध्ये ही वाढ झाल्यामुळे…
- या पूलाच्या पूर्व बाजूस रस्त्याच्या नाल्यावर छोटा पूल आहे, तो या कामामध्ये ७०० मिमी जाडीच्या आर.आर.सी स्लॅबमध्ये बांधला जाणार होता. पण आता तो प्री-कास्ट गर्डरसह सुधारित आराखड्यानुसार बांधण्याचा निर्णय घेण्यात आल्याने…. (GMLR Nahur Bridge)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community