Trimbakeshwar Nashik: प्रसादाचा पेढा खाताय, सावधान! त्र्यंबकेश्वरमध्ये अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

232
Trimbakeshwar Nashik: प्रसादाचा पेढा खाताय, सावधान! त्र्यंबकेश्वरमध्ये अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
Trimbakeshwar Nashik: प्रसादाचा पेढा खाताय, सावधान! त्र्यंबकेश्वरमध्ये अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar Nashik) येथे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने प्रसाद तसेच खाद्यपदार्थांच्या दुकांनावर छापा टाकून ५४ हजार ४४० रुपयांचा भेसळयुक्त माल ताब्यात घेतला आहे. तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिध्दी असल्याने तसेच उन्हाळी सुट्यांच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar Nashik) येथे भाविक आणि पर्यटकांची गर्दी वाढली आहे. भेसळयुक्त अन्नपदार्थांतून भाविक आणि पर्यटकांचे आरोग्य बिघडू नये, यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने कारवाई करण्यात येत आहे. (Trimbakeshwar Nashik)

(हेही वाचा –Amit Shah: “देश शरियावर चालवायचा का?” UCC ला विरोध करणाऱ्यांना अमित शाहांचा थेट प्रश्न)

त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar Nashik) मंदिरानजीक असलेल्या दुकानांमध्ये, प्रसाद भांडारात भेसळयुक्त मावासदृश्य स्पेशल बर्फी पासून पेढा आणि कलाकंद बर्फी तयार करुन विकण्यात येते. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात भोलेनाथ स्विट्समधून ३७ हजार ४४० रुपयांचा ७८ किलो कुंदा, श्री नित्यानंद पेढा सेंटरमधून ६ हजार ६०० रुपयांचा २२ किलोचा माल जप्त करण्यात आला. (Trimbakeshwar Nashik)

(हेही वाचा –Vice Admiral Dinesh Kumar Tripathi यांची नवे नौदल प्रमुख म्हणून नियुक्ती)

भेसळयुक्त पेढे, कलाकंद बर्फी तयार करण्यासाठी वापरात येणारा मावासदृश्य अन्न पदार्थाचा साठा नाशवंत असल्याने त्र्यंबक नगरपरिषदेच्या घंटागाडीत टाकून कचरा डेपोत नष्ट करण्यात आला. यातील अन्न पदार्थाचे नमुने विश्लेषकास पाठवण्यात आले असून अहवाल आल्यानंतर कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. (Trimbakeshwar Nashik)

हे पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.