- ऋजुता लुकतुके
एलॉन मस्क (Elon Musk) यांची बहुचर्चित भारत भेट पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. सीएनबीसी टीव्ही१८ या वृत्तवाहिनीने ही ब्रेकिंग बातमी दिली आहे. त्यानंतर मस्क यांनीही आपली भारत भेट पुढे ढकलल्याचं ट्विटमधून जाहीर केलं आहे. आधीच्या कार्यक्रमानुसार, मस्क २१ एप्रिलला नवी दिल्लीत येणार होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी भारत भेटीविषयी एक ट्विटही केलं होतं. या ट्विटमध्ये, भारतात जाण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. (Elon Musk)
(हेही वाचा- Pune Terrorist Case: पुण्यातील कोंढवा आणि मोमीनपुरा परिसरात एटीएसची कारवाई, १५ दहशतवादी ताब्यात)
Looking forward to meeting with Prime Minister @NarendraModi in India!
— Elon Musk (@elonmusk) April 10, 2024
आता मस्क यांनी नवीन ट्विट करून टेस्ला कंपनीच्या काही महत्त्वाच्या बैठकांमुळे भारत (India) भेट पुढे ढकलत असल्याचं म्हटलंय. वर्षअखेरीस पुन्हा एकदा या भेटीची आखणी केली जाईल, असं नवं ट्विट मस्क यांनी आता केलंय. (Elon Musk)
२१ एप्रिलला खाजगी विमानाने भारतात आल्यावर २२ एप्रिलच्या सकाळी मस्क आणि नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट होईल, असं बोललं जात होतं. मस्क यांच्या निवासासाठी दिल्लीतील ओबेरॉय हॉटेलच्या काही प्रशस्त खोल्याही आरक्षित करण्यात आल्या आहेत. पण, सध्या ही भेटच पुढे ढकलली जात असल्याचं समजतंय. (Elon Musk)
(हेही वाचा- Pandit Sudhakar Chaturvedi: श्री श्री रविशंकर यांचे पहिले गुरु कोण?)
मस्क भारतात टेस्ला कंपनीच्या (Tesla Company) कारचं उत्पादन करण्यासाठी उत्सुक आहेत. त्यासाठी भारतात जागा बघण्याची प्रक्रियाही त्यांच्या कंपनीने सुरू केल्याचं समजतंय. त्यासाठी भारतात २२ अब्ज अमेरिकन डॉलरची गुंतवणूक करण्यासाठी ते उत्सुक आहेत. भारताबरोबरचे संबंध जुळून आले तर पुढे जाऊन देशात २० ते ३० अब्ज अमेरिकन डॉलरची गुंतवणूक करण्याची मस्क यांची तयारी आहे. आधीच्या कार्यक्रमानुसार, मस्क पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर सोमवारी संध्याकाळी भारतातील स्टार्टअप उदयोजकांचीही भेट घेणार आहेत. (Elon Musk)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community