- ऋजुता लुकतुके
काही ठरावीक कालावधीनंतर नवीन बाईक बाजारात आणून धमाल उडवून द्यायची हा सुझुकी कंपनीने पाडलेला पायंडाच आहे. १९९० च्या दशकात कंपनीने एसव्ही ६५० बनवून दुचाकींच्या दुनियेत क्रांती केली होती. या बाईकची ताकद मोठी होती. ती परवडणारी होती. अगदी खंडांचा प्रवास करू शकेल अशी तिची तयारी होती. त्यानंतर कंपनीने बाईकचं इंजिन मात्र फारसं बदललं नव्हतं. (Suzuki GSX-8S)
आता कंपनीने त्या दृष्टीनेही क्रांती केली आहे. नवीन नेकेड बाईक बाजारात आणायची तयारी चालवली आहे. या बाईकचं नाव आहे सुझुकी जीएसएक्स ८एस. (Suzuki GSX-8S) सर्व वयोगटाती लोकांना ही बाईक आपलीशी वाटेल असा प्रयत्न या बाईकच्या डिझायनिंगमध्ये केला आहे. आणि कामगिरीवरही लक्ष दिलं आहे. नेहमीच्या वापरासाठी तसंच आठवड्याचा शिणवटा घालवण्यासाठी करायच्या रोड ट्रिपना अशा सगळ्या वापरासाठी ही नेकेड बाईक सज्ज असेल. (Suzuki GSX-8S)
Suzuki gsx 8x standing dlm kelasnya harga RM50k utk 50 pembeli pertama… pic.twitter.com/an7oexf6ov
— eLpAcCo Faez LoCo (@kustomsixmagz) June 18, 2023
जीएसएक्स ८एस बाईकचं इंजिन ८२ एचपी आणि ७६६ सीसी क्षमतेचं ट्विन इंजिन आहे. इथून पुढील बाईकमध्येही कंपनी हेच इंजिन वापरणार आहे. जीएसएक्स बाईकमध्ये कंपनीने तीन नवीन रंग मात्र आणले आहेत. आधीच्या निळ्या रंगाच्या जोडीला आता आहेत काळा आणि राखाडी रंगाचं कॉम्बिनेशन. शिवाय पांढऱ्या बाईकला निळी चाकं आणि निळी सबफ्रेम हे पर्यायही उपलब्ध आहेत. (Suzuki GSX-8S)
(हेही वाचा- Bus Accident: ओव्हरटेक करताना बसचा भीषण अपघात, २१ पोलीस जखमी)
यामाहा, कावासाकी आणि होंडा या सगळया कंपन्यांकडून या बाईकला स्पर्धा निर्माण होणार आहे. पण, पुन्हा एकदा किफायतशीर किंमत हा या मॉडेलचा युएसपी ठरणार आहे. कारण, भारतात जीएसएक्स ८एसची किंमत सुरू होईल ती सात लाखांपासून. (Suzuki GSX-8S)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community