Thane Election 2024: ठाणे जिल्ह्यात निवडणूक कर्तव्यार्थ असलेले अधिकारी, कर्मचारी, पोलीस मतदान कसे करणार? वाचा सविस्तर…

ठाणे जिल्ह्यात निवडणूक कर्तव्यार्थ नेमणूक झालेले अधिकारी व कर्मचारी यांची संख्या सुमारे ३२,000 एवढी आहे.

198
Thane Election 2024: ठाणे जिल्ह्यात निवडणूक कर्तव्यार्थ असलेले अधिकारी, कर्मचारी, पोलीस मतदान कसे करणार? वाचा सविस्तर...
Thane Election 2024: ठाणे जिल्ह्यात निवडणूक कर्तव्यार्थ असलेले अधिकारी, कर्मचारी, पोलीस मतदान कसे करणार? वाचा सविस्तर...

ठाणे जिल्ह्यात निवडणूक कर्तव्यार्थ असलेले अधिकारी/ कर्मचारी, अत्यावश्यक सेवेत असलेल्या अधिकारी, कर्मचारी व पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी पोस्टल सुविधा केंद्र व पोस्टल मतदान केंद्राच्या माध्यमातून आपले मत बजाविता येणार आहे. निवडणूक कर्तव्यावर असलेले सर्व कर्मचारी १०० टक्के मतदानाचा हक्क बजावणार असा ठाम निर्धार प्रशासनाने केला आहे. (Thane Election 2024)

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४च्या कार्यक्रमानुसार ५व्या टप्प्यामध्ये ठाणे जिल्हयातील २३-भिवंडी, २४-कल्याण व २५-ठाणे या लोकसभा मतदार संघामध्ये तसेच धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई पश्चिम, मुंबई उत्तर मध्य व मुंबई दक्षिण या १३ लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे. या १३ मतदारसंघातून टपाली मतपत्रिका प्राप्त करून घेणे व टपाली मतदान नोंदविल्यानंतर मतपत्रिका सर्व १३ लोकसभा मतदारसंघात पाठविणे आवश्यक आहे. या कार्यवाहीसाठी मोठ्या प्रमाणावर वाहन व कर्मचारी व्यवस्था तसेच सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : भाजपाची दक्षिण भारतातील ‘या’ ५ राज्यांवर नजर )

अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या ३२,०००
ठाणे जिल्ह्यात निवडणूक कर्तव्यार्थ नेमणूक झालेले अधिकारी व कर्मचारी यांची संख्या सुमारे ३२,000 एवढी आहे. भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या अत्यावश्यक सेवा व त्याअंतर्गत येणाऱ्या पोलीस विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. ठाणे जिल्हयामध्ये निवडणूक कर्तव्यार्थ असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे व उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी केले होते. त्यानुसार भारत निवडणूक आयोगाकडील सूचनेनुसार निवडणूक कर्तव्यार्थ असलेले अधिकारी/ कर्मचारी, अत्यावश्यक सेवेत असलेल्या अधिकारी, कर्मचारी व पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना पोस्टाने मतपत्रिका न पाठविता पोस्टल सुविधा केंद्र (Postal Facilitation Center) व पोस्टल मतदान केंद्र (Postal Voting Center)मध्ये मतदान करून घेण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर फॉर्म १२ व फॉर्म १२डी प्राप्त होणार असून, प्राप्त झालेले फॉर्म सर्व पाचव्या टप्प्यात मतदान होणाऱ्या १३ लोकसभा मतदारसंघ व त्या अंतर्गत असलेल्या सर्व विधानसभा मतदारसंघनिहाय वर्गीकरण करून संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यापर्यंत पोहचविण्यात येणार आहे.

कर्मचारी मतदान केंद्रावरच बजावणार हक्क
ही वस्तुस्थिती पाहता, या प्रक्रियेमध्ये सुलभता आणण्यासाठी जिल्हा निवडणूक कार्यालयाने मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या परवानगीने दि. १८/०४४/२०२४ रोजी १३ लोकसभा मतदारसंघाच्या प्रतिनिधी यांनी एकत्र येऊन टपाली मतपत्रिकेचे प्राप्त झालेले नमुना १२ व १२ डी एकमेकांना हस्तांतरीत केले आहेत. हस्तांतरानंतर ठाणे जिल्ह्यात नमुना १२चे एकूण ४ हजार ३०१ व नमुना १२डी चे ३१० अर्ज प्राप्त झाले आहेत तसेच ठाणे जिल्ह्याने नमुना १२चे २ हजार १२० प्राप्त अर्ज वरील १३ लोकसभा मतदारसंघाना वाटप केले आहेत. या कर्मचाऱ्यांना टपाली मतपत्रिकाचे हस्तांतरण करण्यात येणार आहे तसेच अजूनही १३ मतदारसंघाकडे नमुना अर्ज १२ व १२ डी प्राप्त होणार असून त्यांचेही हस्तातंरण ठाणे जिल्हाधिकारी स्तरावर होणार आहे. अद्याप बऱ्यांच कर्मचाऱ्यांचे टपाली मतपत्रिकेचे अर्ज येणे बाकी आहे तसेच ज्या कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे काम त्यांच्या मतदारसंघामध्येच मिळणार आहे, असे कर्मचारी EDC(Election Duty Certificate)चा वापर करून आपल्या मतदान केंद्रावर (Polling Booth)मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.