Lok Sabha Election 2024 : काँग्रेसला आणखी एक धक्का; मधुकरराव चव्हाण यांचे चिरंजीव Sunil Chavan भाजपामध्ये

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोलापूर दौऱ्यावर असताना भेट घेतली होती. या भेटीदरम्यान त्यांचे पुत्र सुनील चव्हाण यांचा भाजपाप्रवेश निश्चित झाला होता, असे मानले जात आहे.

202
Lok Sabha Election 2024 : काँग्रेसला आणखी एक धक्का; मधुकरराव चव्हाण यांचे चिरंजीव Sunil Chavan भाजपामध्ये

धाराशिव जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा तुळजापुरातील एक मोठे प्रस्थ माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे चिरंजीव सुनील चव्हाण हे भाजपामध्ये प्रवेश करणार असून त्यामुळे जिल्ह्यात काँग्रेसला फार मोठा धक्का बसला आहे. या अगोदर धाराशिव जिल्ह्यातील मुरुमचे नेते तथा माजी मंत्री बसवराज पाटील यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केला होता. विशेष म्हणजे ऐन लोकसभा निवडणुकीच्या वातावरणात त्यांनी भाजपाला साथ दिल्याने महाविकास आघाडीसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. (Lok Sabha Election 2024)

धाराशिव लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अर्चना पाटील यांच्यात ही लढत होत आहे. या निवडणुकीत ओमराजे निंबाळकर यांचे पारडे जड मानले जात होते. परंतु शिंदे गटाचे नेते तथा पालकमंत्री तानाजी सावंत, तुळजापूरचे काँग्रेस नेते मधुकरराव चव्हाण यांचे चिरंजीव सुनील चव्हाण, माजी मंत्री बसवराज पाटील मुरुमकर यांच्यासारखे मोठे नेते एकवटल्याने ओमराजे निंबाळकर यांच्यासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. आता या लढाईत माजी खासदार रवि गायकवाड काय भूमिका घेतात, हे महत्त्वाचे आहे. ते देखील शिंदे गटात गेले आहेत. परंतु ते नाराज असल्याचे समजते. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Navi Mumbai : आचारसंहितेमुळे यंदा महाराष्ट्र दिनाचे ध्वजारोहण साध्या पद्धतीने होणार)

धाराशिव लोकसभेतील महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या शक्तिप्रदर्शनाच्या निमित्ताने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे धाराशिवला येणार होते. परंतु ते आले नाहीत. त्यामुळे सुनील चव्हाण यांचा भाजपाप्रवेश झाला नसला तरी ते महायुतीच्या शक्तिप्रदर्शनाच्या वेळी बसवराज पाटील यांच्यासमवेत हजर होते. या अगोदर सुनील चव्हाण यांनी महाराष्ट्र काँग्रेस कमिटी सचिवपदाचा राजीनामा दिला आहे. या अगोदर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांची सोलापूर दौऱ्यावर असताना भेट घेतली होती. या भेटीदरम्यान त्यांचे पुत्र सुनील चव्हाण यांचा भाजपाप्रवेश निश्चित झाला होता, असे मानले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर सुनील चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. दरम्यान, सुनील चव्हाण यांचा भाजप प्रवेश ठरला असला तरी मधुकरराव चव्हाण काँग्रेस पक्षातच राहणार असल्याचे समजते. (Lok Sabha Election 2024)

पटोले यांच्याकडे पाठविला राजीनामा

सुनील चव्हाण यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे काँग्रेसच्या सचिवपदाचा राजीनामा दिला आहे. यासोबतच त्यांनी काँग्रेसचे सदस्यत्वही सोडले. त्यामुळे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांचा भाजपा प्रवेश निश्चित मानला जात आहे. बसवराज पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांनीच काँग्रेस पक्षाला आणखी एक मोठा धक्का दिल्याचे मानले जात आहे. मधुकरराव चव्हाण आणि त्यांचे चिरंजीव आतापर्यंत महाविकास आघाडीच्या प्रचारातही सामील झालेले नव्हते. त्यामुळे त्यांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा अगोदरपासूनच रंगली होती. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.