- ऋजुता लुकतुके
मुंबई इंडियन्सचा टी-२० स्पेशालिस्ट फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) या हंगामात सुरुवातीचे ३ सामने दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. पण, त्यानंतर ४ सामन्यांत त्याने दोन धुवाधार अर्धशतकं ठोकली आहेत. पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यातही त्यानेच ७८ धावा करत मुंबईच्या विजयात मोठी भूमिका बजावली. दक्षिण आफ्रिका दौरा आणि नंतर ऑस्ट्रेलियाची टी-२० मालिका पार पडल्यानंतर सूर्यकुमारला स्पोर्ट्स हार्निया आणि घोट्याच्या दुखापतीने सतावलं होतं. दक्षिण आफ्रिकेत जाऊन त्याने शस्त्रक्रियाही करून घेतली. पण, दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर तो मैदानात परतला तो जुना फॉर्म घेऊनच. (IPL 2024 Suryakumar Yadav)
पंजाब विरुद्ध ७८ धावांची खेळी साकारल्यानंतर सूर्यकुमारने (Suryakumar Yadav) दोन डावांच्या मध्ये पत्रकारांशी बोलताना तंदुरुस्ती आणि फॉर्म यावर भाष्ट केलं. ‘हळू हळू मी पूर्णपणे तंदुरुस्त होतोय. मी ४० षटकं मैदानावर राहू शकेन इतकी तंदुरुस्ती आणखी काही दिवसांतच परत येईल, याची खात्री वाटते. खेळातील सगळे फटके मात्र परतले आहेत. त्यामुळे फलंदाजी करताना छान वाटतंय. माझं ट्रेनिंग नियमितपणे सुरू आहे. त्याचा मला फायदा होतोय,’ असं सूर्यकुमार यावेळी म्हणाला. (IPL 2024 Suryakumar Yadav)
𝐒𝐮𝐩𝐥𝐚 𝐊𝐮𝐦𝐚𝐫 𝐘𝐚𝐝𝐚𝐯 – 360° coverage 🏟️
78(53) – What a knock 👏#MumbaiMeriJaan #MumbaiIndians #PBKSvMI pic.twitter.com/eQ7aYaMWJX
— Mumbai Indians (@mipaltan) April 18, 2024
(हेही वाचा – IPL 2024 Ashutosh Sharma : जसप्रीत बुमराचा षटकार खेचणारा पंजाबचा अनकॅप्ड आशुतोष शर्मा)
सूर्यकुमारला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं
पुनरागमनानंतर चार सामन्यांत सूर्यकुमारने (Suryakumar Yadav) अनुक्रमे ०, ५२, ० आणि ७८ धावा केल्या आहेत. यावर तो म्हणतो, ‘क्रिकेटमध्ये चढ उतार असतातच हेच यामुळे सिद्ध होते. मुल्लनपूरची खेळपट्टी थोडीशी संथ होती. त्यामुळे एकातरी फलंदाजाने १५-१७ षटकं खेळून काढावी अशी रणनीती संघाने आखली होती. त्यामुळे सुरुवातीला फटकेबाजी न करता सांभाळून खेळलो आणि मग हात मोकळे सोडले.’ (IPL 2024 Suryakumar Yadav)
रोहित आधी बाद झाल्यामुळे सूर्यकुमारने शेवटपर्यंत टिकून राहण्याची जबाबदारी स्वीकारली. मुंबईने १९३ धावा केल्यानंतर उर्वरित काम जसप्रीत बुमरा आणि गेराल्ड कोत्झीएनं पूर्ण केलं. दोघांनी प्रत्येकी ३ बळी मिळवले. पंजाबकडून आशुतोष शर्माने २८ चेंडूंत ६२ धावांची खेळी करत पंजाबला विजयाची संधी मिळवून दिली होती. पण, तो बाद झाल्यावर मुंबईला विजयापासून कुणी रोखू शकलं नाही. सूर्यकुमार यादवलाच (Suryakumar Yadav) सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. (IPL 2024 Suryakumar Yadav)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community