Mohammed Shami : दुखापतीनंतर क्रिकेटच्या मैदानावर परतण्यासाठी मोहम्मद शामी उत्सुक

Mohammed Shami : शामी गुजरात टायटन्सकडून या हंगामात खेळणार होता. 

160
Mohammed Shami : दुखापतीनंतर क्रिकेटच्या मैदानावर परतण्यासाठी मोहम्मद शामी उत्सुक
  • ऋजुता लुकतुके

भारताचा स्टार तेज गोलंदाज मोहम्मद शामी (Mohammed Shami) पायाच्या घोट्यावर झालेल्या शस्त्रक्रियेतून आता सावरतोय. लवकरात लवकर मैदानात पुनरागमन करण्यासाठी तो उत्सुक आहे. आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स संघाशी तो करारबद्ध आहे. पण, दुखापतीमुळे सध्या तो खेळू शकत नाहीए. तर इंग्लंड विरुद्धच्या पाच सामन्यांची मालिकेतही तो खेळू शकला नव्हता. त्यानंतर इंग्लंडमध्ये त्याच्या दुखऱ्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली. (Mohammed Shami)

आता मात्र तो दुखापतीतून सावरलाय. याविषयीची एक पोस्ट त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. ‘दुखापती ही तुमची ओळख नाही. खेळत राहणं ही तुमची ओळख आहे. संघासोबत मैदानावर उतरण्यासाठी मी तयार आहे, असं शामीने (Mohammed Shami) या पोस्टमध्ये लिहिलंय. अर्थात, खालच्या हॅशटॅगमध्ये त्याने आयपीएलचा उल्लेख केलेला नाही. म्हणजेच तो आयपीएल खेळू शकणार नाही हे निश्चित आहे. (Mohammed Shami)


(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: मोदींनी ‘माझे लहान भाऊ’, असे म्हणताच जानकरांनी वाजवली शिट्टी, कारण? वाचा…)

वेदनाशामक गोळ्या घेऊन शामीने  खेळला सामना 

३३ वर्षीय शामी (Mohammed Shami) गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. एकदिवसीय विश्वचषकातील ऑस्ट्रेलिया विरुद्धचा अंतिम सामना हाच त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना. या स्पर्धेतही त्याचा पाय दुखावलेलाच होता. पण, तो वेदनाशामक गोळ्या घेऊन खेळला, हे नंतर स्पष्ट झालं. या स्पर्धेत ७ सामन्यांत त्याने २४ बळी मिळवले होते आणि तो सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला होता. (Mohammed Shami)

विश्वचषक स्पर्धेनंतर मात्र दक्षिण आफ्रिका दौरा आणि अफगाणिस्तान विरुद्धची मालिका तो दुखापतीमुळे खेळला नाही. आधी विश्रांतीने बरी होईल असं वाटलेली त्याची दुखापत पुढे चिघळली आणि फेब्रुवारी महिन्यात त्याला शस्त्रक्रिया करून घ्यावी लागली. आयपीएलमध्ये (IPL) मागचे दोन हंगाम तो गुजरात टायटन्सकडून खेळला आहे. यात त्याने २०२२ मध्ये २० तर २०२३ च्या हंगामात २८ बळी मिळवले होते. शेवटच्या हंगामात पर्पल कॅपही त्याच्याकडे होती. (Mohammed Shami)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.