BMC : मुंबईतील जाहिरात कंपन्यांकडून झाडांची कत्तल? ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या वृत्ताची दखल; सोमय्यांची मनपाला पत्र लिहून चौकशीची मागणी

पेट्रोल पंपाच्या समोर असलेल्या उड्डाणपुलाच्या भिंतीला जाहिरातीचे होर्डिंग लावायचे असतात. या होर्डिंगला लागून असलेली जी झाडे आडवी येत आहेत, त्यांच्यावर विषप्रयोग झाल्याचा संशय आहे.

201
BMC : मुंबईतील जाहिरात कंपन्यांकडून झाडांची कत्तल? 'हिंदुस्थान पोस्ट'च्या वृत्ताची दखल; सोमय्यांची मनपाला पत्र लिहून चौकशीची मागणी

पूर्व द्रुतगती महामार्गावरील झाडांवर झालेल्या विषप्रयोग हा जाहिरात कंपन्यांकडून करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या झाडांवर झालेल्या विषप्रयोगाचे वृत्त सर्वात प्रथम ‘हिंदुस्थान पोस्ट’ने देऊन या घटनेला वाचा फोडल्यानंतर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी या घटनेची दखल घेऊन घटनास्थळाला भेट देऊन मुंबई महानगरपालिकेला (BMC) पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी मागील १२ महिन्यांत मुंबईत झालेल्या झाडांच्या कत्तलीबाबत मनपाने चौकशीचे आदेश देण्यात यावे, अशी मागणी केली आहे.

New Project 2024 04 20T181352.473

घाटकोपर पूर्व द्रुतगती महामार्ग, रेल्वे पेट्रोल पंपासमोर, मृत अवस्थेत आढळून आलेल्या या वृक्षांवर विषप्रयोग करून ती नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. तर पूर्व द्रुतगती महामार्ग जंक्शन पूल ते रमाबाई आंबेडकर नगर येथील नालापर्यंत दुभाजकावर असलेल्या २२ फॉक्स टेल पाम प्रजातीच्या झाडांची कत्तल करण्यात आली असल्याचे मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) ‘एन वॉर्ड’ उद्यान विभागाचे अधिकारी कृष्णा लांबे यांच्या लक्षात आले. त्यांनी घटनास्थळी पाहणी केली असता रेल्वे पेट्रोल पंपासमोर असलेले पेल्टोफोरम, सुबाभूळ आणि पिंपळ अशा जवळपास २० झाडांच्या बुंध्यावर ड्रिल मशीनने छिद्रे करून त्यात विषारी रासायनिक द्रव्य ओतण्यात आले आहे. प्रत्येकी झाडांवर ५ ते ६ छिद्रे आढळून आलेले आहेत. या विषारी रासायनिक द्रव्यामुळे झाडांची पाने गळून पडली व सर्व झाडांच्या फांद्या पूर्णपणे सुकल्यामुळे झाडे मृत झाली आहे. तर पूर्व द्रुतगती महामार्ग जंक्शन पूल ते रमाबाई आंबेडकर नगर येथील नालापर्यंत दुभाजकावर लावण्यात आलेली फॉक्स टेल पाम प्रजातीच्या २२ झाडांची कटरच्या सहाय्याने कत्तल करण्यात आली आले. हे वृत्त ‘हिंदुस्थान पोस्ट’ने १९ एप्रिल रोजी प्रसिद्ध केले होते.

(हेही वाचा – Ghatkopar : वृक्षांच्या मुळावर उठलंय कोण? ४५ वृक्षांवर विषप्रयोग)

New Project 2024 04 20T181507.944

या झाडांच्या कत्तली आणि विषप्रयोगामागे जाहिरात कंपन्यांचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोल पंपाच्या समोर असलेल्या उड्डाणपुलाच्या भिंतीला जाहिरातीचे होर्डिंग लावायचे असतात. या जाहिरात होर्डिंगला लागून असलेली जी झाडे आडवी येत आहेत, त्यांच्यावर विषप्रयोग झाला, ती  झाडे नष्ट करण्याचा हेतूने जाहिरात कंपन्याकडून झाडांवर विषप्रयोग करण्यात आला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान या झाडाच्या कत्तलीचे वृत्त ‘हिंदुस्थान पोस्ट’मध्ये प्रसिद्ध होताच पर्यावरण प्रेमींनी या घटनेचा निषेध करून या घटनेच्या चौकशीची मागणी केली आहे. तसेच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शनिवारी घाटकोपर येथील घटनास्थळी भेट देऊन सोमय्या यांनी महानगर पालिकेला पत्र लिहून या घटनेची चौकशी करण्यात यावी, तसेच मागील १२ महिन्यांत मुंबईत झालेल्या झाडांच्या बेकायदेशीर कत्तलीच्या घटनांच्या चौकशीचे आदेश देण्यात यावे, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.