Lawrence Bishnoiच्या नावाने कॉल करणाऱ्या सिरीयल हॉक्स कॉलरला GRPच्या पोलिसांनी केली अटक

चंद्रशेखर वामने याने दारूची नशा करून यापूर्वी देखील मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला कॉल केला होता असल्याची माहिती देखील समोर येत आहे.

186
Navi Mumbai: बनावट नोटांच्या छापखान्यावर धाड घालून तरुणावर गुन्हा दाखल, २ लाखांच्या नोटा जप्त

मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षास हॉक्स कॉल करणाऱ्या आरोपीस कल्याण जीआरपीने (GRP) कल्याण परिसरातील वालधुनी येथील राहत्या घरातून ताब्यात घेतले. शनिवारी (२० एप्रिल) दुपारी दादर जीआरपीच्या (मध्य रेल्वे) ताब्यात अटकेच्या कारवाईसाठी सुपूर्द केले आहे. चंद्रशेखर कलिंगा वामने (वय ४५) या आरोपीला दादर जीआरपीने ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दादर जीआरपीचे पोलीस अधिकारी अनिल कदम यांनी दिली आहे. (Lawrence Bishnoi)

काल, शुक्रवारी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षास कॉल करून लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) गॅंगचा हस्तक दादर स्टेशनवर येणार असून मोठी घटना घडवून आणणार असल्याची माहिती दिली. या कॉलनंतर मुंबई पोलिसांसह रेल्वे पोलीस देखील अलर्ट मोडवर आले आणि ज्या मोबाईल क्रमांकावरून कॉल आला होता, त्या मोबाईल क्रमांकाची माहिती काढली असता मोबाईल धारक कल्याणच्या वालधुनी परिसरात असल्याचे आढळून आले. त्यावर कल्याण जीआरपी (GRP) यांना माहिती कळवून आरोपी चंद्रशेखर वामने याला त्याच्या बहिणीच्या घरातून ताब्यात घेतले. (Lawrence Bishnoi)

(हेही वाचा – आमदार Raees Shaikh यांचा राजीनामा; पक्षांतर्गत नाराजीतून राजीनामा दिल्याची चर्चा)

आरोपी चंद्रशेखर वामने याचे लग्न झालेले असून त्याला पाच मुले आहेत. मूळचा उस्मानाबादचा असलेल्या चंद्रशेखर वामने याला दोन वर्षांपूर्वी त्याची पत्नी सोडून माहेरी गेली असल्याची माहिती कल्याण जीआरपीने (GRP) दिली आहे. पत्नी सोडून गेल्यानंतर आरोपी चंद्रशेखर वामने हा तणावाखाली होता. तसेच त्याला दारूचे व्यसन होते. जेव्हा मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षास चंद्रशेखरने हॉक्स कॉल केला, तेव्हा तो मद्यपान केलेल्या अवस्थेत होता अशी माहिती मिळत आहे. तसेच चंद्रशेखर वामने याने दारूची नशा करून यापूर्वी देखील मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला कॉल केला होता असल्याची माहिती देखील समोर येत आहे. (Lawrence Bishnoi)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.