Volkswagen Taigun 1.5 TSI GT Plus Sport : फोक्सवॅगन कंपनी भारतात घेऊन येतेय टायगन एसयुव्हीचे दोन नवीन व्हेरियंट

Volkswagen Taigun 1.5 TSI GT Plus Sport : टायगन जीटी स्पोर्ट्स गाडीत नावाप्रमाणे कामगिरीवर भर देण्यात आला आहे. 

615
Volkswagen Taigun 1.5 TSI GT Plus Sport : फोक्सवॅगन कंपनी भारतात घेऊन येतेय टायगन एसयुव्हीचे दोन नवीन व्हेरियंट
  • ऋजुता लुकतुके

फोक्सवॅगन (Volkswagen) कंपनीने अलीकडे भारतीय बाजारपेठेवर लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यामुळे भारतीय लोकांच्या गरजा आणि आवड लक्षात घेऊन कंपनीने आपल्या टायगन या एसयुव्हीचे दोन नवीन प्रकार भारतात लाँच करायचं ठरवलं आहे. यातला एक आहे टायगन १.५ टीएसआय जीटी प्लस स्पोर्ट आणि दुसरा टायगन १.० एटी जीटी लाईन. यातील पहिली एसयुव्ही नावाप्रमाणेच स्पोर्ट्स म्हणजे कामगिरीवर भर देणारी आहे. आणि तिचं डिझाईन आणि लुकही थोडा स्पोर्टी आहे. (Volkswagen Taigun 1.5 TSI GT Plus Sport)

लाँचपूर्वीचं गाडीचं डिझाईन एका ऑटो वेबसाईटवर लीक झालं आहे आणि एव्हाना ते सगळ्यांपर्यंत पोहोचलंही आहे. टायगन गाडीचा चेहरामोहरा थोडा जास्त आकर्षक आणि आक्रमक वाटावा यासाठी कंपनीने जीटी प्लस स्पोर्टमध्ये ग्रील, डुफ्‌युजर, चाकं अशा सगळ्या गोष्टींचा रंग बदलून तो काळा केला आहे. अगदी फेंडर बॅजेसनाही काळ्या रंगाचं फिनिशिंग असेल. (Volkswagen Taigun 1.5 TSI GT Plus Sport)

गाडीच्या आत डोकावलंत तर सीट्सवरील लेदर आवरणाला काळ्या रंगाबरोबरच लाल रंगाचं स्टिचिंग असेल. ॲल्युमिनिअम पेडल्स आणि पूर्ण काळ्या रंगाचा नवीन डॅशबोर्ड. तर स्टिअरिंग व्हीलला काळ्या रंगात गुंफलेला लाल रंग असे बदल कंपनीने जीटी प्लस स्पोर्ट्स गाडीत केले आहेत. (Volkswagen Taigun 1.5 TSI GT Plus Sport)

(हेही वाचा – Lawrence Bishnoiच्या नावाने कॉल करणाऱ्या सिरीयल हॉक्स कॉलरला GRPच्या पोलिसांनी केली अटक)

टायगन जीटी प्लस स्पोर्ट गाडीची किंमत १८ लाख रुपयांपासून सुरू

इंजिनासाठी ग्राहकांना दोन पर्याय मिळतील. पहिला पर्याय असेल तो १.०, ३ सिलिंडरच्या टर्बो पेट्रोल इंजिनाचा. हे इंजिन ११४ बीएचपी इतकी शक्ती निर्माण करू शकतं. तर दुसरा पर्याय असेल तो १.५, ४ सिलिंडर टर्बो पेट्रोल इंजिनाचा. ही गाडी १४८ बीएचपी इतकी शक्ती निर्माण करू शकते. १.५ टर्बो इंजिन हा टायगन गाडीचा युएसपी असेल. यात ६ गिअरचा मॅन्युअल आणि ७ गिअरचा स्वयंचलित गिअरबॉक्स असे दोन पर्याय असतील. (Volkswagen Taigun 1.5 TSI GT Plus Sport)

चालक आणि सहप्रवाशांच्या सुरक्षेच्या बाबतीत टायगन इतर कंपन्यांच्या एक पाऊल पुढे आहे. गाडीत ज्येष्ठ नागरिक आणि तान्ह्या बाळांच्या सुरक्षेचीही काळजी घेतल्याचा दावा कंपनीने केला आहे. ६ एअरबॅग्ज बरोबरच टायगनमध्ये इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल यंत्रणा बसवण्यात आली आहे. टायगन जीटी प्लस स्पोर्ट गाडीची किंमत १८ लाख रुपयांपासून सुरू होते. (Volkswagen Taigun 1.5 TSI GT Plus Sport)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.