बोरीवलीतील बाभई आणि वझिरा गावठाणमध्ये प्रचार सुरु असताना भाजपाचे उमेदवार व केंद्रीय मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी मासळीचा वास सहन न झाल्याने नाकाला रुमाल लावल्याने त्यांचा निषेध केला जात आहे. तसेच सोशल मिडियावरही ट्रोल केले जात आहे. त्यानंतर शनिवारी त्यांनी मनोरी येथील मच्छिमार बांधवांची भेट घेतली. शनिवारी पियुष गोयल यांनी मच्छिमारांसोबत बरेच तास सत्कारणी लावले. यावेळी त्यांनी मात्र रुमाल तोंडाला लावला नाही तर चक्क डोक्यात कोळ्यांची टोपी परिधानच तिथे वावरले. त्यांनी स्थानिक चर्चचे पाद्री रेव्ह. फादर डॉन जॉन यांच्याशीही संवाद साधला. यावेळी धर्मगुरूंनी त्यांचा गौरव केला आणि विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी संपूर्ण ख्रिश्चन समाजाच्या पाठिंब्याचे आश्वासन दिले.
मासेमारीसाठी मत्स्य प्रक्रिया केंद्र
भाजपाचे उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातील उमेदवार पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी मनोरीमध्ये प्रचार करताना मनोरी हिंदु ग्रामस्थांसोबत संवाद साधला. मनोरी येथील मच्छिमार बांधवांसोबत बोलतांना गोयल यांनी आरोग्य सुविधा आणि रुग्णालय तातडीने तयार करण्याचे आश्वासन दिले. तसेच विविध मच्छिमार संस्थांसाठी शीतपेट्या आणि मासेमारीसाठी मत्स्य प्रक्रिया केंद्र स्थापन करण्याचे आश्वासन दिले.
क्रीडांगण आणि क्रीडाविषयक पायाभूत सुविधा
गोयल यांनी मनोरीतील घरांना पक्के स्वरूप देण्याचा निर्णय घेतला जाईल असे आश्वासन देतानाच या परिसरात क्रीडांगण आणि क्रीडाविषयक व पायाभूत सुविधा नसल्याची माहिती ग्रामस्थांनी देताच त्यांनी क्रीडांगण सुविधा उपलब्ध करून देऊ असे सांगितले. तसेच पाणीपुरवठा पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याचे आश्वासन दिले.
मोदीजींनी या क्षेत्राला हमी
गेल्या १० वर्षात मोदी सरकारने मत्स्यव्यवसासाठी विविध योजना आणि धोरणे तयार केली आहेत. २०१८-१९ पासून मोदीजींनी मत्स्यव्यवसायासाठी स्वतंत्र विभाग तयार केला आहे. उत्तम तंत्रज्ञानाद्वारे मत्स्यव्यवसाय क्षेत्राचे उत्पादन वाढविण्यापासून ते सुलभ अटी व शर्तींवर कर्ज उपलब्ध होण्यापर्यंतची मोदीजींनी या क्षेत्राला हमी दिली असल्याचे गोयल (Piyush Goyal) यांनी सांगितले.
मच्छिमारांसोबत बरेच तास लावले सत्कारणी
भाजपाच्या जाहीरनाम्यात मत्स्यपालनाचा विकास, क्लस्टर्स आदी महत्त्वाच्या ठिकाणी मत्स्य पैदास केंद्रांची हमी दिली आहे.उत्तम तंत्रज्ञानाद्वारे मत्स्यव्यवसाय क्षेत्राचे उत्पादन वाढवण्यापासून ते सुलभ मासेमारी करण्यापर्यंत, मत्स्य प्रजनन केंद्रांचा विकास क्लस्टरची हमी देतो,असेही गोयल यांनी सांगितले. आज पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी मच्छिमारांसोबत बरेच तास सत्कारणी लावले. त्यांनी स्थानिक चर्चचे पाद्री रेव्ह. फादर डॉन जॉन यांच्याशी संवाद साधला. आदरणीय धर्मगुरूंनी त्यांचा गौरव केला आणि विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी संपूर्ण ख्रिश्चन समाजाच्या पाठिंब्याचे आश्वासन दिले. यावेळी आमदार सुनील राणे, माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी तसेच मच्छीमार बंधू-भगिनी, कार्येकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Join Our WhatsApp Community