Poor LS candidate : देशातील सगळ्यात गरीब उमेदवार महाराष्ट्रात!

Poor LS candidate : महाराष्ट्रातील गरीब उमेदवाराची एकूण मालमत्ता आहे ५०० रुपये. त्याच्याकडे ना जमीन, ना सोने, चांदी ना मोटर वाहन आहे. इतकंच काय तर हा कोणत्याही पक्षाचा नाही. अपक्ष निवडणूक लढवत आहे.

643
  • सुजित महामुलकर

देशात सुरू झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) मतदानाचा पहिला टप्पा पार पडला तर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याच्या उमेदवारी अर्ज प्रक्रियादेखील सुरू झाली. आज २१ एप्रिलपर्यंत देशभरात २,८२३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर त्यात सगळ्यात गरीब उमेदवार (Poor LS candidate) प्रगत समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात असून ‘हिंदुस्थान पोस्ट’ने त्यांच्याशी संपर्क साधला आहे. (Poor LS candidate)

मालमत्ता ५०० रुपये

ह्या महाराष्ट्रातील गरीब उमेदवाराची एकूण मालमत्ता आहे ५०० रुपये. त्याच्याकडे ना जमीन, ना सोने, चांदी ना मोटर वाहन आहे. इतकंच काय तर हा कोणत्याही पक्षाचा नाही. अपक्ष निवडणूक लढवत आहे. लक्ष्मण नागोराव पाटील (Laxman Nagorao Patil) असे या ३४-वर्षीय उमेदवाराचे नाव असून नांदेड लोकसभा (Nanded Lok Sabha) मतदार संघातून पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे आणि अर्जाची छाननीदेखील झाली आहे. त्यांचा अर्ज वैध ठरला आहे. मु. पो. सोनारी, ता. भोकर येथील रहिवासी असलेल्या, नववीपर्यंत शिक्षण घेतलेल्या पाटील यांची निवडणूक लढवण्याची ही पहिलीच वेळ आहे. उत्पन्न कमी असले तरी त्यांच्यावर कोणत्याही बँकेचे किंवा संस्थेचे एक पैशाचेही कर्ज नाही, असे त्यांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञा पत्रात नमूद केले आहे. (Poor LS candidate)

(हेही वाचा- Lok Sabha Election 2024: निवडणुकीसंदर्भातील विविध परवानग्यांसाठी ‘सुविधा पोर्टल’ वापरा, निवडणूक अधिकाऱ्यांचे आवाहन)

काय म्हणाले पाटील

‘हिंदुस्थान पोस्ट’ने पाटील (Laxman Nagorao Patil) यांच्याशी संपर्क साधला असता पाटील म्हणाले, “मला शेतकऱ्यांनी निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला आहे. माझ्याकडे पैसे नाहीत, त्यामुळे शेतकरी, कष्टकरी हेच मला मदत करत आहेत,” असे पाटील यांनी सांगितले. पाटील यांनी शेतकऱ्यांच्या विविध आंदोलनात सहभाग घेतला असून शेतकऱ्यांचे प्रश्न प्रामुख्याने सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. (Poor LS candidate)

आईकडून उसणे पैसे घेतले

बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कापूस, हळद, सोयाबीन, उसाला हमीभाव असा आपला अजेंडा असल्याचे पाटील म्हणतात. निवडणूक लढवण्यासाठी २५,००० रुपये अनामत रक्कम त्यांनी आपल्या आईकडून उसणे घेतल्याचे पाटील यांनी सांगितले. (Poor LS candidate)

(हेही वाचा- Meteorology Department: २४ तासांत मुंबई, ठाण्यात अवकाळी पावसाचा अंदाज, कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी? वाचा सविस्तर…)

सगळ्यात श्रीमंत कोण?

पाटील सगळ्यात गरीब असून, सगळ्यात श्रीमंत उमेदवार कर्नाटकात असल्याचे एका पाहणीत सिद्ध झाले आहे. वेंकटरामन गौडा हे कर्नाटकातील मांड्या लोकसभा मतदार संघातील श्रीमंत उमेदवार असून काँग्रेस (Congress) पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळाली आहे. गौडा यांची मालमत्ता ६२२ कोटी रुपायांहून अधिक आहे. यात २१२ कोटी जंगम आणि ४१० कोटी स्थावर मालमत्ता आहे.  (Poor LS candidate)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.