मध्य आफ्रिकन रिपब्लिकमध्ये प्रवाशांना घेऊन जाणारी एक बोट नदीत बुडाली. प्रवाशांना घेऊन जाताना नदी ओलांडताना घेऊन जाताना या बोटीचा अपघात झाला. या अपघातानंतर बोटीतील ५० प्रवाशांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. (Accident)
या घटनेबाबत प्रत्यक्षदर्शींनी असोसिएटेड प्रेसला कळवले. त्यांच्या म्हणण्यानुसार, बोटीत सुमारे ३०० प्रवासी होते. ही लाकडी बोट राजधानी बांगुईमधून मापोको नदी ओलांडत होती. त्याच सुमारास हा अपघात झाला. स्थानिक बोटवाल्यांनी आणि मच्छिमारांनी सर्वप्रथम बचावकार्य सुरू केले. अपघाताची ही घटना शुक्रवारी, (१९ एप्रिल) घडली. प्रशासनाकडून मदतकार्य सुरू आहे.
(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: निवडणुकीसंदर्भातील विविध परवानग्यांसाठी ‘सुविधा पोर्टल’ वापरा, निवडणूक अधिकाऱ्यांचे आवाहन)
लष्कराच्या शोध मोहिमेचे कार्य सुरू
बचाव कार्यात सहभागी मच्छिमार एड्रियन मोसामो यांनी सांगितले की, लष्कर पोहोचेपर्यंत किमान २० मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. लष्कराच्या शोध मोहिमेचे कार्य सुरू आहे शिवाय शोध मोहिमेचा विस्तारही सुरू असल्याने मृतांची संख्या वाढत असल्याचे बांगुई विद्यापीठ रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community