हल्लीच्या काळात आरोग्य विमा काढण्याकडे लोकांचा कल वाढू लागला आहे. कोरोना काळानंतर तर आरोग्य विम्याची मागणी लक्षणीय वाढली. शक्यतो ६५ वर्षांपर्यंतच विमा काढला जायचा, मात्र आता या नियमात IRDAIने बदल केले आहेत.
भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने नियमांमध्ये बदल केला आहे. याअंतर्गत आता कोणत्याही वयोगटातील लोकं आरोग्य विमा खरेदी करू शकतात. हे बदल १ एप्रिल २०२४पासून लागू करण्यात आले आहेत. या बदललेल्या नवीन नियमामुळे लोकांना फायदा होत आहे याशिवाय वयोमर्यादा काढल्यामुळे आरोग्य पॉलिसी खरेदी करण्याची प्रेरणा अधिकाधिक लोकांना मिळत आहे.
(हेही वाचा – Heatwave : उष्माघाताची बातमी देताना दूरदर्शनची अँकर स्टुडिओतच कोसळली!)
नवीन नियम कोणते?
-IRDAIच्या नव्या नियमांमुळे आता विमा कंपन्यांना कर्करोग, हृदय किंवा मूत्रपिंड निकामी होणे आणि एड्स सारख्या गंभीर वैद्यकीय स्थिती असलेल्या व्यक्तींना पॉलिसी जारी करण्यास नकार देता येणार नाही.
-आरोग्य विम्यासाठी प्रतीक्षा कालावधी कमी करण्याचा निर्णयही घेतला आहे. आता ते ४८ महिन्यांवरून ३६ महिन्यांवर आणण्यात आले आहे.
-विमा नियामकाने आरोग्य विमा कंपन्यांना या ३६ महिन्यांनंतर आधीच अस्तित्वात असलेल्या अटींच्या आधारे दावे नाकारण्यास प्रतिबंधित केले आहे.
-याशिवाय विमा कंपन्यांना नुकसानभरपाई-आधारित आरोग्य पॉलिसी सुरू करणे थांबवून नफ्यावर आधारित पॉलिसी ऑफर करण्यास सांगितले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community