Assam : आसाममध्ये मुसलमान नेत्याचे निवडणूक प्रचारात थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान; निवडून आल्यावर ७०० नवीन मदरसे उघडणार

199

आसाममध्ये (Assam) लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोर धरत चालला आहे. त्यातच आता मुसलमान नेते धर्माच्या नावाखाली मुसलमानांना भडकावत मतांची बेगमी करू लागले आहेत. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी शेकडो मदरसे बंद करून त्याजागी मुलांना आधुनिक शिक्षण मिळावे म्हणून इंग्रजी शाळा उघडल्या आहेत, आता निवडणूक प्रचारात मुसलमान नेते निवडणुकीत निवडून आल्यावर त्या इंग्रजी शाळा बंद करून तिथे नव्याने पुन्हा मदरसे सुरु करणार, असे म्हणाले आहेत.

(हेही वाचा Health Insurance: आता कितीही वय असले, तरी काढता येणार आरोग्य विमा; IRDAIने नियमात कोणते बदल केले?)

काय म्हणाले बदरुद्दीन अजमल?

आसाममधील (Assam) ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचे प्रमुख बदरुद्दीन अजमल यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना आव्हान दिले आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर 700 नवीन मदरसे उघडणार असे ते म्हणाले आहेत. बद्रुद्दीन अजमल यांनी शनिवारी, 20 एप्रिल 2024 रोजी नागाव येथील निवडणूक रॅलीदरम्यान भाषण केले. एआययूडीएफचे प्रमुख बदरुद्दीन अजमल शनिवारी नागावमधून त्यांचे उमेदवार अमिनुल इस्लाम यांच्यासाठी प्रचार करत होते. यावेळी त्यांनी जनसमुदायाला संबोधित केले. (Assam) समोर उपस्थित असलेली गर्दी पाहून बद्रुद्दीन अजमल यांनी भडकाऊ भाषण सुरु केले. लोकसभा निवडणुकीनंतर आम्ही आसाममधील करीमगंज आणि नागाव येथील AIUDF खासदारांसोबत 700 नवीन मदरसे उघडू. हिमंता बिस्वा सरमा, ऐका, तुमच्या डायरीत लिहा, बदरुद्दीन अजमल संसदेत येत आहेत. आम्ही तिघे भाऊ 700 मदरसे उघडू, असे ते म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.