लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तिसऱ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात ३१७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातून देण्यात आली. तिसऱ्या टप्प्यात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारी संपत २२ असून त्यानंतर लढतींचे चित्र स्पष्ट होईल.
(हेही वाचा – देश काँग्रेसवर नाराज आहे आणि त्याच्या “पापांची” शिक्षा देत आहे, PM Narendra Modi यांचा कॉंग्रेसवर घणाघात)
लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तिसऱ्या टप्प्यात राज्यातील ११ लोकसभा मतदारसंघात येत्या ७ मे रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत १९ एप्रिल रोजी संपली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे २० एप्रिलला उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली. छाननी अंती रायगड लोकसभा मतदार संघात २१, बारामतीमध्ये ४६, उस्मानाबाद येथे ३५, लातूर ३१, सोलापूर ३२ माढा ३८ सांगली २५ सातारा २१, रत्नागिरी-सिंधुदुर्ग ९ कोल्हापूर २७ आणि हातकणंगले मतदारसंघात ३२ असे एकूण ३१७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community