Nalesafai : मुंबईत आतापर्यंत ४७.६० टक्के नालेसफाईचे काम पूर्ण

मुंबईतील मोठ्या व लहान नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे वेगाने सुरु आहेत. यंदा पावसाळ्यापूर्वी एकूण १० लाख २१ हजार ७८२ मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

171
Mumbai Nalesafai : मुंबईची तुंबई होण्यापासून रोखण्याचे महापालिका आयुक्तांसमोर आव्हान 
Mumbai Nalesafai : मुंबईची तुंबई होण्यापासून रोखण्याचे महापालिका आयुक्तांसमोर आव्हान 
विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबईतील मोठ्या व लहान नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे वेगाने सुरु आहेत. यंदा पावसाळ्यापूर्वी एकूण १० लाख २१ हजार ७८२ मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यापैकी आतापर्यंत ४ लाख ८६ हजार ३७८ मेट्रिक टन म्हणजे निर्धारित उद्दिष्टाच्या ४७.६० टक्के गाळ काढण्‍यात आला असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. पावसाळ्यापूर्वी म्हणजे ३१ मे २०२४ रोजीच्या विहित मुदतीत नाल्‍यातील गाळ काढण्‍याची कामे पूर्ण केली जातील, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) प्रशासनातर्फे देण्यात येत आहे.

WhatsApp Image 2024 04 21 at 6.18.36 PM

मुंबईत दरवर्षी पावसाळ्यापूर्वी महानगरपालिकेच्या वतीने पर्जन्य जलवाहिन्या विभागाच्या माध्यमातून मुंबई महानगरातील मोठ्या नाल्यांमधून गाळ (Nalesafai) काढला जातो.  तर विभाग कार्यालयांच्या स्तरावर लहान नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे केली जातात. नाल्यांमधून गाळ काढल्याने पावसाळी पाण्याचा जलद गतीने निचरा होण्यासाठी मदत मिळते. पावसाळ्यापूर्वी नाल्यांमधून किती गाळ उपसणे आवश्यक आहे, याचा अभ्यास करुन गाळ उपशाचे उद्दिष्ट निश्चित केले जाते. (Nalesafai)

(हेही वाचा – Pandav Wada : पांडववाड्यात अतिक्रमण केलेल्या मशिदीच्या चाव्या नगरपरिषदेत द्या; हिंदूंना प्रवेश द्या; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय)

मुंबईतील पर्जन्यमान आणि पावसाची तीव्रता याबाबतचा अनुभव लक्षात घेऊन, हे उद्दिष्ट ठरविले जाते. त्यानुसार, यंदा १० लाख २१ हजार ७८२ मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. पैकी, आतापर्यंत ( २१ एप्रिल २०२४) ४ लाख ८६ हजार ३७८ मेट्रिक टन म्हणजे निर्धारित उद्दिष्टाच्या ४७.६० टक्के गाळ काढण्‍यात आला आहे. (Nalesafai)

WhatsApp Image 2024 04 21 at 6.18.36 PM 1

प्रतिवर्षाप्रमाणे मार्चच्या पहिल्या आठवड्यात यंदाही कामे सुरु झाल्यानंतर वेगाने सर्व कामे पूर्ण करण्यात येत आहेत. गाळ काढण्याची ही सर्व कामे नियोजित वेळापत्रकाप्रमाणे पूर्ण करावीत, आवश्यक तेथे अतिरिक्त यंत्रणा, मनुष्यबळ नेमून कामांना वेग द्यावा, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी यंत्रणेला दिले आहेत. त्यानुसार, शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे या तीनही विभागांमध्ये कामे जलदगतीने करण्यात येत आहेत. नाल्यांमधून उद्दिष्टाएवढे किंवा त्याहूनही अधिक गाळ काढण्याचे काम ३१ मे २०२४ अखेरपर्यंत पूर्ण करण्याची मुदत निश्चित करण्यात आली आहे. या मुदतीत ही कामे पूर्ण होतील, असा प्रशासनाला ठाम विश्वास आहे. त्यादृष्टीने नियोजन करून संपूर्ण यंत्रणेने कार्यवाहीला सुरुवात केली आहे.

(हेही वाचा – Health Insurance: आता कितीही वय असले, तरी काढता येणार आरोग्य विमा; IRDAIने नियमात कोणते बदल केले?)

काम सुरु होण्यापूर्वी, प्रत्यक्ष काम सुरु असताना आणि काम संपल्यानंतर अशा तिनही टप्प्यांमध्ये प्रत्यक्ष दिनांक, वेळ, अक्षांश, रेखांश (रिअलटाइम जिओ टॅग) यासह चित्रफित व छायाचित्रे तयार करुन ती सॉफ्टवेअरवर अपलोड करणे कंत्राटदारांना बंधनकारक करण्यात आले आहे. असे छायाचित्रण व चित्रफित तयार करताना दररोज नाल्यांमधून गाळ काढल्यानंतर तो ठेवल्याची जागा, नाल्याकाठची दैनंदिन छायाचित्रे, सदर गाळ डंपरमध्ये भरण्यापूर्वी डंपर पूर्ण रिकामा असल्याचे दर्शविणारे चित्रण, डंपरमध्ये गाळ भरताना आणि भरल्यानंतरचे चित्रण, गाळ वाहून नेल्यानंतर क्षेपणभूमीवर आलेल्या व जाणा-या डंपर वाहनांच्या क्रमांकाची तसेच वेळेची नोंद करणे, क्षेपणभूमीवर येणा-या – जाणा-या वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा उभारणे ही सर्व जबाबदारी कंत्राटदारांकडून करुन घेण्यात येत आहे. (Nalesafai)

WhatsApp Image 2024 04 21 at 6.18.36 PM 2

(हेही वाचा – BMC : मुंबईतील जाहिरात कंपन्यांकडून झाडांची कत्तल? ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या वृत्ताची दखल; सोमय्यांची मनपाला पत्र लिहून चौकशीची मागणी)

अशाप्रकारे झाली आहे नालेसफाई
शहर विभाग:
विविध नाल्‍यांमधून ३० हजार ९४० मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. पैकी आतापर्यंत १० हजार ४४० मेट्रिक टन गाळ काढला. हे प्रमाण ३३.७४ टक्‍के आहे.
पूर्व उपनगर:
विविध नाल्‍यातून १ लाख २३ हजार ५५३ मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे. पैकी आतापर्यंत ५९ हजार ३४४ मेट्रिक टन गाळ काढला असून हे प्रमाण ४८.०३ टक्‍के आहे.
पश्चिम उपनगर:
विविध नाल्‍यातून २ लाख ३५ हजार ०२१ मेट्रिक टन गाळ काढला जाणार आहे. पैकी आतापर्यंत ९९ हजार ८०२ मेट्रिक टन गाळ काढला असून हे प्रमाण ४२.४७ टक्‍के आहे.
मिठी नदी:
या नदी परिसरातून २ लाख १६ हजार १७४ मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट आहे. पैकी, आतापर्यंत १ लाख ४५ हजार ८०८ मेट्रिक टन गाळ काढला आहे. हे प्रमाण ६७.४५ टक्‍के आहे.
मुंबईतील सर्व लहान नाले :
या नाल्यातून ३ लाख ६३ हजार ५३३ मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे. पैकी आतापर्यंत १ लाख ४९ हजार २३० मेट्रिक टन गाळ काढला आहे. हे प्रमाण ४१.०५ टक्‍के आहे.
महामार्गांलगतचे नाले :
या नाल्‍यांमधून एकूण ५२ हजार ५६० मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट आहे. पैकी आतापर्यंत २१ हजार ७५२ मेट्रिक टन गाळ काढला असून हे प्रमाण ४१.३९ टक्‍के आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.