लग्नाला नकार दिल्यामुळे कर्नाटकातील फैयाज खोंडुनाईक या नराधमाने नुकतीच नेहा हिरेमठ या तरुणीची चाकूने भोसकून हत्या केली. नेहाचे वडील निरंजन हिरेमठ हे काँग्रेस नेते आणि नगरसेवक आहेत. या घटनेनंतर कर्नाटकातील वातावरण तापले असून लव्ह जिहादच्या (Love Jihad) या प्रकरणाला हिंदूंकडून विरोध केला जात आहे. हिरेमठ यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले, अशा घटना वेगाने घडत आहेत.
तरुण चुकीचा मार्ग स्वीकारत आहेत. हे कुणाच्याही संदर्भात घडू नये. मला वाटते की, लव्ह जिहाद (Love Jihad) वेगाने पसरत आहे. माता-भगिनींना घराबाहेर पडतांना काळजी घेणे आवश्यक आहे. निरंजन हिरेमठ यांनी जरी या प्रकरणाला ‘लव्ह जिहाद’ (Love Jihad) म्हटले असले, तरी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे गृहमंत्री जी. परमेश्वरन् यांनी हे प्रकरण लव्ह जिहादचे नसल्याचे म्हटले आहे. जी. परमेश्वरन् पत्रकारांशी बोलतांना म्हणाले, ‘फैयाजने कदाचित् नेहाला भोसकले असेल; कारण त्याला वाटले असेल की, नेहा दुसर्याशी लग्न करील. मला याविषयी अधिक ठाऊक नाही; पण या प्रकरणात दोन्ही बाजूंचे लोक सहभागी होते.
काय म्हणाले निरंजन हिरेमठ?
पीडितेचे वडील निरंजन हिरेमठ पुढे म्हणाले, मी सर्व मातांना आवाहन करतो की, जर तुमची मुलगी महाविद्यालयात गेली, तर तिच्यासमवेत जा; कारण माझ्या मुलीसमवेत जे घडले, ते कुणाच्याही बाबतीत घडू नये, याची काळजी घ्या. आजूबाजूची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. मी राज्य सरकार आणि इतर सर्व नेत्यांना या प्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी करतो.
फैयाजचे वडील बाबासाहेब सुबानी काय म्हणाले?
फैयाजचे वडील बाबासाहेब सुबानी यांनी या घटनेवरून म्हटले की, नेहाला माझा मुलगा फैयाज त्रास देत होता. फैयाजने केलेल्या कृत्यामुळे मला धक्का बसला आहे. फैयाजला अशी शिक्षा मिळावी की, पुन्हा कधीही कुणी अशा प्रकारचे कृत्य करू धजावणार नाही. नेहाच्या कुटुंबाची मी क्षमा मागतो. माझ्या मुलाने गुन्हा केला, हे मी मान्य करतो. फैयाज आणि नेहा यांचे प्रेमसंबंध होते. त्याला तिच्याशी विवाह करायचा होता; पण माझा याला नकार होता. दुसरीकडे कर्नाटकचे कामगार मंत्री संतोष लाड यांनी असे कृत्य करणार्यांना चकमकीत ठार मारले पाहिजे, तसेच केंद्र आणि राज्य सरकारांनी याविषयी विचार केला पाहिजे, अशी मागणी केली. (Love Jihad)
Join Our WhatsApp Community