Love Jihad मध्ये प्राण गमावलेल्या हिंदू मुलीचे वडील काँग्रेसच्या नगरसेवकाची जे.पी. नड्डा यांनी घेतली भेट

210

कर्नाटकात काँग्रेसचे नगरसेवक हिरेमठ यांची मुलगी नेहा हिचा धर्मांध मुसलमान फैयाज यांनी भोसकून खून केला. या प्रकरणी सगळेजण नेहाला Love Jihad ची बळी झाल्याचे म्हणत आहेत, मात्र कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि गृहमंत्री परमेश्वरा हे मात्र मुसलमानांच्या लांगुलचालन करण्यासाठी याला Love Jihad मानण्यास तयार नाहीत. रविवार, २१ एप्रिल रोजी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी कर्नाटकात येऊन हिरेमठ यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि गृहमंत्री परमेश्वरा यांच्यावर टीका केली.

प्रकरण सीबीआयकडे सोपवावे

हिरेमठ कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर नड्डा यांनी माध्यमांशी संवाद साधला. नेहा हिरेमठची हत्या ही  Love Jihad धक्कादायक घटना असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री तुष्टीकरणाचे राजकारण करत असल्याचा आरोप केला. 18 एप्रिल रोजी निरंजन हिरेमठ यांची मुलगी नेहा हिची बीव्हीबी कॉलेजच्या आवारात भोसकून हत्या करण्यात आली होती. या घटनेवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले, ‘ही धक्कादायक घटना आहे आणि आम्ही त्याचा निषेध करतो. या घटनेवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि गृहमंत्री जी परमेश्वरा यांचे वक्तव्य आक्षेपार्ह आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे तपास कमकुवत होतो. तुष्टीकरणाच्या राजकारणासाठी कर्नाटकातील जनता सध्याच्या सरकारला सोडणार नाही. राज्य पोलीस तपास करू शकत नसतील तर राज्य सरकारने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवावे. हिरेमठ यांचा राज्य पोलिसांवर फारसा विश्वास नसल्याने या घटनेची सीबीआय चौकशी करण्याची मागणीही केली आहे.

(हेही वाचा Love Jihad : मुलीला धर्मांधाने ठार केले हा लव्ह जिहादच; कर्नाटकातील पीडित मुलीचे वडील काँग्रेसच्या नगरसेवकाने केले मान्य )

आरोपीच्या वडिलांनी माफी मागितली

२३ वर्षीय फैयाजच्या वडिलांनी पीडित कुटुंबाची माफी मागितली असून आपल्या मुलाला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. तो अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी म्हणाला, “त्याला (फैयाज) अशी शिक्षा द्यायला हवी की भविष्यात कोणीही असे कृत्य करण्याची हिंमत करणार नाही. हात जोडून मी नेहाच्या कुटुंबीयांची माफी मागतो. ती माझ्या मुलीसारखी होती.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

काँग्रेस नगरसेवक निरंजन हिरेमठ यांची मुलगी नेहा हिरेमठ (२३) हिची १८ एप्रिल रोजी बीव्हीबी महाविद्यालयाच्या आवारात चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती. ती एमसीएच्या प्रथम वर्षाची विद्यार्थिनी होती तर फैयाज तिचा माजी वर्गमित्र आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, फैयाजने नेहावर चाकूने अनेक वार केले. चौकशीत त्याने असा दावा केला की दोघांमध्ये प्रेमसंबंध Love Jihad होते पण नेहा काही दिवसांपासून त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.