Ajit Pawar: “निकाल यायच्या आधीच भाजपला विधानसभेत…” अजित पवारांनी केला शरद पवारांवर टीका करताना मोठा गौप्यस्फोट

250
Ajit Pawar:
Ajit Pawar: "निकाल यायच्या आधीच भाजपला विधानसभेत..." अजित पवारांनी केला शरद पवारांवर टीका करताना मोठा गौप्यस्फोट

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) अमरावती येथे भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारसभेत केलेल्या भाषणावेळी त्यांनी अनेक गौप्यस्फोट केले. शरद पवार यांच्यावर टीका करत अनेक खुलासे त्यांनी केले आहेत. अजित पवार (Ajit Pawar) यावेळी म्हणाले, “माझ्यासमोर युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना जाती-पाती आणि नात्यागोत्याचा विचार केला नव्हता. त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. राजांनी सर्व मावळ्यांना एकवटलं आणि त्यातून इतिहास निर्माण केला. हा इतिहास आपल्या सर्वांना माहिती आहे. महाराजांचा हा इतिहास ऐकल्यावर आजही आपली छाती फुगते. असाच काही इतिहास लोकांना माहिती नाहीये.” (Ajit Pawar)

(हेही वाचा –Love Jihad मध्ये प्राण गमावलेल्या हिंदू मुलीचे वडील काँग्रेसच्या नगरसेवकाची जे.पी. नड्डा यांनी घेतली भेट)

भाजपला विधानसभेत बाहेरून पाठिंबा दिला होता

“मी विकासाच्या मागे जाणारा कार्यकर्ता असल्यामुळे काही निर्णय घेतले. मी (Ajit Pawar) अनेकदा आमच्या सहकाऱ्यांना सांगितलं, काही वेळा आमच्या वडिलधाऱ्यांनाही सांगितलं होतं. अनेकांना माहिती नसेल की, २०१४ मध्ये आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीचा संपूर्ण निकाल यायच्या आधीच भाजपला विधानसभेत बाहेरून पाठिंबा दिला होता. त्यानंतर आपले देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले होते. त्यानंतर आम्हाला सांगण्यात आलं की, काही दिवसांनी आपल्याला त्या सरकारमध्ये जायचं आहे. परंतु, कुठं काय खटकलं माहिती नाही. तेव्हा वरून केवळ आदेश यायचे आणि आम्ही फक्त त्या आदेशांची अंमलबजावणी करायचो.” (Ajit Pawar)

(हेही वाचा –Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंना निवडणुक आयोगाची नोटीस!)

तेच सातत्य मी आजपर्यंत टिकवलं आहे

“एक हाडाचा कार्यकर्ता म्हणून मी (Ajit Pawar) महाराष्ट्रभर फिरतो. मला पहाटे पाच वाजता उठून सहा वाजता कामाला लागायची सवय आहे. मी अक्षरश: माझ्या मतदारसंघात ६ वाजल्यापासून कामाला सुरुवात करतो. तेच सातत्य मी (Ajit Pawar) आजपर्यंत टिकवलं आहे. त्यामुळे मी (Ajit Pawar) कामाचा माणूस आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील दिवसाच्या २४ तासांतले १८ ते २० तास काम करतात. परदेशातून आले तरी आराम न करता कामाला लागतात.” असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. (Ajit Pawar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.