D Gukesh Makes History : डी गुकेशने रचला इतिहास, कँडिडेट्स चषकाचा वयाने सगळ्यात लहान विजेता

D Gukesh Makes History : १७ वर्षीय गुकेशने संभाव्या १४ पैकी ९ गुण मिळवले

222
D Gukesh Makes History : डी गुकेशने रचला इतिहास, कँडिडेट्स चषकाचा वयाने सगळ्यात लहान विजेता
D Gukesh Makes History : डी गुकेशने रचला इतिहास, कँडिडेट्स चषकाचा वयाने सगळ्यात लहान विजेता
  • ऋजुता लुकतुके

भारताच्या १७ वर्षीय डी गुकेशने व्यावसायिक बुद्धिबळात इतिहास (D Gukesh Makes History) रचताना सगळ्यात लहान वयात प्रतिष्ठेचा कँडिडेट्स चषक (Candidates Cup) जिंकण्याचा मान मिळवला आहे. आता तो जगज्जेत्या डिंग लिरेनचा आव्हानवीर ठरू शकतो. चार दशकांपूर्वीचा गॅरी कॅस्परोव्हचा विक्रमही गुकेशने मोडला आहे. सतराव्या वर्षी गुकेशने स्पर्धेतील १४ उपलब्ध गुणांपैकी ९ गुण कमावले. इतर प्रतिस्पर्ध्यांपेक्षा तो अर्ध्या गुणाने सरस ठरला. विश्वनाथन आनंद नंतर कँडिडेट्स चषक जिंकणारा तो दुसरा भारतीय ठरला आहे. (D Gukesh Makes History)

(हेही वाचा- Rajnath Singh: संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सियाचीन दौऱ्यासाठी रवाना, सशस्र दलाच्या जवानांशी साधणार संवाद)

कॅस्परोव्हने २२ व्या वर्षी पहिल्यांदा ही स्पर्धा जिंकली होती. ती जिंकून तो अनातोली कारपोव्हला आव्हान द्यायला सिद्ध झाला होता. त्या तुलनेत गुकेश ५ वर्षांनी लहानच आहे. (D Gukesh Makes History)

अंतिम फेरीत गुकेशचा मुकाबला जपानच्या नाकामुराशी होता. काळ्या मोहऱ्यांनी खेळणाऱ्या गुकेशने सुरुवातीपासून जोखीम न पत्करता सावध खेळ केला. डावाच्या मध्यावर राणी आणि हत्ती एकमेकांशी ट्रेड करत सामना बरोबरीतच राहील याची काळजी दोघांनी घेतली. त्यामुळे गुकेशला बरोबरी सहज साध्य झाली. १३ व्या फेरीनंतर गुकेश एकटा आघाडीवर होता. त्यामुळे अव्वल स्थान राखण्यासाठी त्याला बरोबरी पुरेशी होती. शिवाय निकटचे प्रतिस्पर्धी करुना, नेपोमिनियाची आणि नाकारमुरा हे साडेआठ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिले. (D Gukesh Makes History)

(हेही वाचा- Ratnagiri Airport: रत्नागिरी विमानतळावर लवकरच सुरू होणार नाईट लँडिंग सुविधा, पहिली चाचणी यशस्वी)

गुकेशच्या या कामगिरीचं भारतात सगळीकडे कौतुक होत आहे. रविवारी भारतीय वेळेसुनार, मध्यरात्री गुकेश आणि नाकामुरा यांच्यातील सामन्याचा निकाल लागला. आणि त्यानंतर पहिलं ट्विट आलं ते विश्वनाथन आनंद याच्याकडून. ‘वयाने सगळ्यात लहान आव्हानवीर ठरल्याबद्दल गुकेश तुझं अभिनंदन! कठीण परिस्थितीशी नेटाने मुकाबला केल्याबद्दल मला तुझा अभिमान वाटतो. आताचा हा क्षण साजरा कर,’ असं आनंदने गुकेशला लिहिलं आहे. (D Gukesh Makes History)

गुकेशला या विजेतपदामुळे ७८ लाख रुपयांची बक्षिसाची रक्कम मिळणार आहे. गुकेश डिंग लिरेलला कधी आव्हान देणार आणि ही स्पर्धा कुठे होणार हे अजून ठरलेलं नाही. कँडिडेट्स चषकात (Candidates Cup) भारताचे इतर दोन खेळाडू प्रग्यानंदा आणि विदिथ गुजराथी अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर राहिले. (D Gukesh Makes History)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.