Iraq Fired Rockets: इराककडून सीरियातील अमेरिकन लष्करी तळावर रॉकेट हल्ला

इराक सैन्याने सीरियाच्या सीमेजवळ गुन्हेगारांना लक्ष्य करण्यासाठी एक मोठी शोध मोहीम सुरू केली आहे.

221
Iraq Fired Rockets: इराककडून सीरियातील अमेरिकन लष्करी तळावर रॉकेट हल्ला

इराकचे पंतप्रधान मोहम्मद शिया अल-सुदानी अमेरिकेतून परतल्यानंतर रविवारी, (२१ एप्रिल) इराकने सीरियातील अमेरिकन लष्करी तळावर रॉकेट डागले. इराकच्या जुम्मर शहरातून ईशान्य सीरियातील अमेरिकन लष्करी तळावर किमान ५ रॉकेट डागण्यात आले, अशी माहिती २ इराकी सुरक्षा सूत्रांकडून देण्यात आली आहे. फेब्रुवारीनंतर इराकमधील इराण-समर्थित गटांनी अमेरिकन सैन्यांविरुद्धचे हल्ले थांबवल्यानंतर अमेरिकन सैन्यावर हा पहिला हल्ला आहे. (Iraq Fired Rockets)

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, एका छोट्या ट्रकच्या मागे बसवलेले रॉकेट लाँचर सीरियाच्या सीमावर्ती शहर झुम्मरमध्ये तैनात करण्यात आले होते. लष्करी अधिकाऱ्याने सांगितले की, विमाने आकाशात असताना, फायर न केलेल्या रॉकेटच्या स्फोटामुळे ट्रकला आग लागली. एका लष्करी अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, ”आम्ही तपास करेपर्यंत अमेरिकन युद्ध विमानांनी ट्रकवर बॉम्बफेक केली होती की नाही याची पुष्टी करू शकत नाही.”

(हेही वाचा – Ratnagiri Airport: रत्नागिरी विमानतळावर लवकरच सुरू होणार नाईट लँडिंग सुविधा, पहिली चाचणी यशस्वी )

सीरियाच्या सीमेजवळ गुन्हेगारांना लक्ष्य करण्यासाठी…
झुम्मर शहरातील एका सुरक्षा अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, इराकी सुरक्षा दलांना या भागात तैनात करण्यात आले आहे. त्यांनी दुसऱ्या वाहनाचा वापर करून परिसरातून पळून गेलेल्या गुन्हेगारांचा शोध सुरू केला आहे. इराकी सुरक्षा मेडिका सेलने एका निवेदनात म्हटले आहे की, इराक सैन्याने सीरियाच्या सीमेजवळ गुन्हेगारांना लक्ष्य करण्यासाठी एक मोठी शोध मोहीम सुरू केली आहे आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.