IPL 2024, KKR vs RCB : कोलकाता नाईटरायडर्सला शेवटच्या चेंडूवर विजय मिळवून देणारा फिल सॉल्ट

IPL 2024, KKR vs RCB : बंगळुरूला शेवटच्या चेंडूवर ३ धावा हव्या होत्या

177
IPL 2024, KKR vs RCB : कोलकाता नाईटरायडर्सला शेवटच्या चेंडूवर विजय मिळवून देणारा फिल सॉल्ट
IPL 2024, KKR vs RCB : कोलकाता नाईटरायडर्सला शेवटच्या चेंडूवर विजय मिळवून देणारा फिल सॉल्ट
  • ऋजुता लुकतुके

रविवारी पहिल्या सामन्यात कोलकाता नाईटरायडर्सनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (IPL 2024, KKR vs RCB) शेवटच्या चेंडूवर एका धावेनं पराभव केला. सामन्यात चढ उताराचे अनेक क्षण आले. आणि सामन्याचं पारडं कायम दोन्ही बाजूंना झुकत राहिलं. पण, निर्णायक ठरला तो कोलकाताचा यष्टीरक्षक फिल सॉल्ट. आणि त्याने १४ चेंडूंत ४५ धावा करत संघाला दोनशेच्या पार नेण्यात मोठी भूमिका बजावली. ३ षटकार आणि ७ चौकार ठोकत त्याने शेवटच्या षटकांमध्ये फटकेबाजी करत कोलकाता संघाला ६ बाद २२६ ही धावसंख्या गाठून दिली. आणि नंतर यष्टीमागेही तो प्रभावी ठरला. (IPL 2024, KKR vs RCB)

(हेही वाचा- Ratnagiri Airport: रत्नागिरी विमानतळावर लवकरच सुरू होणार नाईट लँडिंग सुविधा, पहिली चाचणी यशस्वी)

शेवटच्या षटकात बंगळुरूला विजयासाठी २१ धावा हव्या होत्या. आणि चेंडू होता ऑस्ट्रेलियाचा अनुभवी मिचेल स्टार्ककडे. (Mitchell Starc Fuck) पण, कर्ण शर्माने (Karan Sharma) एकामागून तीन षटकार खेचत बंगळुरूला विजयाच्या जवळ आणलं होतं. चौथ्या चेंडूवर कर्ण शर्मा स्टार्ककडेच झेल देऊन बाद झाला. लॉकी फर्ग्युसनवर (Lockie Ferguson) जबाबदारी आली शेवटच्या चेंडूवर ३ धावा वसूल करण्याची. त्याने डीप एक्स्ट्राकव्हरला तो चेंडू टोलवला. २ धावा घेण्याची त्याची योजना होती. क्षेत्ररक्षकाची फेकही फारशी अचूक नव्हती. पण, यष्टीरक्षक सॉल्टने चेंडू झेलला आणि थेट यष्ट्यांवर झेप घेतली. त्याच्या चपळतेमुळेच फर्ग्युसन धावचीत होऊ शकला. (IPL 2024, KKR vs RCB)

बंगळुरूसाठी दिनेश कार्तिकचा एकेरी धाव न घेण्याचा एक निर्णयही वादग्रस्त ठरला. शेवटच्या दोन षटकांत बंगळुरूला विजयासाठी ३१ धावांची गरज होती. दिनेश कार्तिक हा त्यांचा आतापर्यंतचा यशस्वी तळाचा फलंदाज मैदानात होता. पण, जास्तीत जास्त स्ट्राईक घेण्याच्या नादात त्याने कर्ण शर्माला तीन वेळा एकेरी धाव नाकारली. या षटकांत कार्तिक एक षटकार मारु शकला. आणि १८ चेंडूंत २५ धावा करून तो बादही झाला. पण, तो न धावल्यामुळे बंगळुरूसाठी धावांचं गणित आणखी कठीण झालं. आणि शेवटच्या षटकांत २१ धावांचं आव्हान संघासमोर उभं राहिलं. (IPL 2024, KKR vs RCB)

(हेही वाचा- Iraq Fired Rockets: इराककडून सीरियातील अमेरिकन लष्करी तळावर रॉकेट हल्ला)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी यंदाच्या हंगामात कुठलीही गोष्ट मनासारखी घडलेली नाही. ८ पैकी ७ सामने संघाने गमावले आहेत. त्यामुळे संघाचं आव्हान आता संपल्यात जमा आहे. (IPL 2024, KKR vs RCB)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.