Pune-Mumbai Expressway: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहनांची वेगमर्यादा वाढवली; कारण ?

घाटात होणारे मोटारींचे अपघात कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. केवळ मोटारीची वेग मर्यादा वाढवली आहे, जड वाहनांसाठी नाही.

2494
Pune-Mumbai Expressway: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहनांची वेगमर्यादा वाढवली; कारण ?
Pune-Mumbai Expressway: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहनांची वेगमर्यादा वाढवली; कारण ?

द्रुतगती मार्गावरून रोज ६० ते ७० हजार वाहनांची वाहतूक होते. शनिवारी व रविवारी ती संख्या ९० हजारांच्या घरात पोहचते. वाहनांची वाढती संख्या, अपघाताचे वाढते प्रमाण व वाहतूक कोंडीमुळे प्रवासाला ब्रेक लागत आहे. त्यामुळे महामार्ग पोलिसांनी घाटात वेगाची मर्यादा वाढविण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. यामुळे आता मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरचा (Pune-Mumbai Expressway) प्रवास वेगवान होणार आहे.

प्रशासनाने या मार्गावरील घाट सेक्शनमध्ये असलेल्या वाहनांची वेग मर्यादा वाढवली आहे. मोटारीला पूर्वी वेग मर्यादा तशी ५० होती, ती आता ६० केली आहे. त्यामुळे घाटात होणारी वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवास अधिक गतीने पूर्ण होणार आहे.

(हेही वाचा – Iraq Fired Rockets: इराककडून सीरियातील अमेरिकन लष्करी तळावर रॉकेट हल्ला)

समतल भागात मात्र वेगाच्या मर्यादेत कोणताही बदल केलेला नाही. समतल भागात ताशी १०० किलोमीटर व घाटात ताशी ६० किलोमीटरची वेग मर्यादा मोटारीला आखून दिलेला आहे. घाटात होणारे मोटारींचे अपघात कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. केवळ मोटारीची वेग मर्यादा वाढवली आहे, जड वाहनांसाठी नाही. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे, अशी मुंबई, वाहतूक विभागाचे माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक सुखविंदरसिंह यांनी ही माहिती दिली.

…तर अपघात टाळणे शक्य होईल
पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाताना घाटात तीव्र उतार आहे. समतल भागात ताशी १०० किलोमीटरच्या वेगाने धावणाऱ्या वाहनांचा वेग थेट ताशी ५० किलोमीटर आणणे चालकांच्या दृष्टीने अडचणीचे ठरत होते. वेग कमी करताना अनेक वाहनांचे अपघातदेखील झाले आहेत. असे अपघात टाळणे शक्य होईल. वेग वाढविल्याने मोटारी घाटात रेंगाळणार नाहीत, परिणामी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.