- ऋजुता लुकतुके
कोलकाता नाईटरायडर्स (KKR) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) सामन्यात कोलकाताचा एका धावेनं निसटता विजय झाला. सामन्या दरम्यान अनेक उतार चढावाचे प्रसंग आले. पण, सगळ्यात मोठं नाट्य घडलं ते तिसऱ्या षटकांत जेव्हा हर्शित राणाच्या एका उंच उसळलेल्या चेंडूवर विराट कोहली झेलबाद झाला. तोपर्यंत विराटने ७ चेंडूंत १८ धावा केल्या होत्या. आणि २२६ धावांचा पाठलाग करताना त्याने आक्रमक सुरुवात केली होती. (IPL 2024, Virat Kohli)
(हेही वाचा- D Gukesh Makes History : डी गुकेशने रचला इतिहास, कँडिडेट्स चषकाचा वयाने सगळ्यात लहान विजेता)
हर्षित राणाचा (Harshit Rana) हा चेंडू फुलटॉस आला. विराटच्या कमरेच्या वर उसळला. विराट थोडासा गोंधळला. त्याने चेंडू ऑनला तटवण्याचा प्रयत्न केला. पण, चेंडू बॅटची कडा घेऊन ऑफलाच हवेत उडाला. स्वत: हर्षितने हा झेल टिपला. चेंडू कमरेच्या वर असल्यामुळे तो नोबॉल हवा असं समजून विराटने ताबडतोब तिसऱ्या पंचांची मदत घेतली. पण, पंचांनी रिप्ले पाहून चेंडू योग्य असल्याचा निर्वाळा दिला. विराट आणि त्याचा सहकारी फाफ दू प्लेसिसला हा निर्णय रुचला नाही. विराट तर चांगलाच संतापला होता. सामन्या दरम्यान आणि नंतरही अनेक माजी खेळाडूंच्या या चेंडूवर प्रतिक्रिया उमटल्या. म्हणूनच समजून घेऊया नोबॉलचा हा नियम. पण, त्याआधी विराटचा बळी प्रत्यक्ष पाहूया, (IPL 2024, Virat Kohli)
Virat Kohli wicket ,
Umpire Decisions very poor 🥵#ViratKohli #rcbvsKkr#KKRvsRCB#VIRAT #VIRATKOHLIWICKET#WICKET#IPL2024#KOHLI pic.twitter.com/34gmTEGC2c— Sunil Yadav (@Sardar_ka_andaz) April 21, 2024
(हेही वाचा- Israel Iran Conflicts : क्षेपणास्त्र डागून इस्रायलचं विमान पाडलं, या हल्ल्यामागे नेमका कोणाचा हात?)
विराट कोहलीने चेंडू कमरेच्या वरच खेळला होता यात शंका नाही. पण, एमसीसी क्रिकेट नियमांनुसार, मेख इतकीच होती की, विराट क्रीझच्या कितीतरी पुढे उभा होता. चेंडू यष्टीपर्यंत पोहोचेपर्यंत आणखी काही फुटांचं अंतर कापणार होता. तोपर्यंत तो उंची कमी होऊन कमरेच्या खाली असला असता. कमरेच्या वर असलेला चेंडू नोबॉल ठरतो जेव्हा फलंदाज क्रीझमध्ये असतो! असा क्रिकेटचा नियम आहे. जेव्हा फलंदाज क्रीझबाहेर खेळतो तेव्हा चेंडूचा पुढील प्रवास कसा असले याचा अंदाज बांधला जातो. तो नियम विराटच्या विरोधात गेला. (IPL 2024, Virat Kohli)
Ambati Rayudu said – “It’s a big decision. Virat Kohli is a big wicket, and umpires just can’t turn a blind eye before making such trash decisions. Poor umpiring”. (On Virat Kohli). pic.twitter.com/GYDck2W2F6
— Tanuj Singh (@ImTanujSingh) April 21, 2024
प्रत्यक्ष सामना सुरू असताना मात्र विराट आणि त्याचा सहकारी फाफ दू प्लेसिसला चेंडू नोबॉल असल्याचंच वाटलं. विराटने रागाच्या भरात तंबूत पोहोचल्यावर बॅटही जमिनीवर आदळली. पण, स्टार स्पोर्ट्स वाहिनीने हा नियम समजावून सांगितल्यानंतर विराट शांत झाला. (IPL 2024, Virat Kohli)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community