महायुतीमध्ये शिवसेना किती जागांवर निवडणूक लढणार? या बद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) माहिती दिली आहे. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना मुख्यमंत्र्यांनी (Eknath Shinde) आकडा सांगितला आहे. महाराराष्ट्रात पहिल्या टप्प्यात विदर्भात पाच जागांवर मतदान झालं. आता पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात उमेदवारी अर्ज भरण्याचा सिलसिला सुरु आहे. (Eknath Shinde)
शिवसेना एकूण १६ जागांवर निवडणूक लढणार
शिवसेना (Shiv Sena) एकूण १६ जागांवर निवडणूक लढणार आहे. त्यात मुंबईत ३ जागांवर लढणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ही माहिती दिली. महायुतीमध्ये कुठलेही मतभेद नाहीत. विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवत असून आम्ही २०१९ मधला ४२ जागा जिंकण्याचा रेकॉर्ड मोडू असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. (Eknath Shinde)
वडिलांप्रमाणे किंग मेकर बनण्यात नाही, तर किंग बनण्यात इंटरेस्ट होता
“जून २०२२ मध्ये सरकार कोसळण्याआधी महाविकास आघाडीने भाजपाचे आशिष शेलार, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर आणि देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याच कारस्थान रचलं होतं. भाजपाच्या काही आमदारांना फोडण्याच महाविकास आघाडीच प्लानिंग होतं. मुख्यमंत्री बनण्याच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) स्वप्न होतं. महाविकास आघाडीची स्थापना हे सर्व पूर्वनियोजित होतं. वडिलांप्रमाणे किंग मेकर बनण्यात नाही, तर उद्धव ठाकरेंना किंग बनण्यात इंटरेस्ट होता. महाविकास आघाडीत मंत्री म्हणून काम करताना सतत अपमानास्पद वागणुकीचा अनुभव आला. ठाकरे कुटुंबाकडून खासकरुन आदित्य कामात हस्तक्षेप करायचा.” असं एकनाथ शिंदे म्हणाले. (Eknath Shinde)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community