मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मला फोन केला होता आणि मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती.ठाकरेंनी भाजपशी देखील बोलणी सुरु केली होती. असा खुलासा त्यांनी केला आहे. (CM Eknath Shinde)
उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील भाजप नेत्यांना फोन केले
एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले, “मी वसईमध्ये असताना एका ठिकाणी चहा प्यायला थांबलो होतो. यावेळी उद्धव ठाकरेंचा फोन आला. मला त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा ऑफर दिली. पण, मी त्यांना म्हटलं आता खूप उशिर झाला आहे. याशिवाय उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिल्लीतील भाजप नेत्यांना फोन केले. त्यांना सांगण्यात आलं की आपण युती करुया, शिंदेसोबत जाण्याची गरज नाही. पण, आता त्यांच्याकडे काही उरलं नव्हतं. असा एकही दिवस नव्हता जेव्हा माझा अपमान व्हायचा नाही. हा कोणता कट नव्हता तर उठाव होता. राज्यसभेच्या निवडणुकीवेळीच तो सुरु झाला होता. मी माझ्या आमदारांना संजय राऊतांना मतदान करण्यास सांगितलं होतं. त्यांचा पराभव करु शकलो असतो पण केला नाही. त्यानंतर आम्ही सुरतला निघालो.” (CM Eknath Shinde)
…पण, ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद स्वत:कडे ठेवलं
“माझे (CM Eknath Shinde) मंत्रीपद काढून घेण्याचा प्रयत्न होता. जीवाला धोका असून देखील माझी (CM Eknath Shinde) सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली नाही. त्यांना स्वत:ला आणि आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करायचं होतं. मी (CM Eknath Shinde) त्यांना आदित्य ठाकरेंच्या मुख्यमंत्री होण्यात स्पीडब्रेकर वाटत होतो. मला मुंबईमध्ये देखील लक्ष घालू दिलं नाही. उद्धव ठाकरे म्हणाले होते की त्यांना मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं. पण, ते खोटं बोलत आहेत. त्यांची पूर्वीपासूनच मुख्यमंत्री व्हायची इच्छा होती. शिवाय त्यांना मुख्यमंत्रीपद ठाकरे कुटुंबाकडेच ठेवायचं होतं. महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचं शरद पवारांनी सूचवलं नाही. पवारांकडे काही माणसं पाठवण्यात आली होती. त्यांनी पवारांकडे उद्धव ठाकरेंच्या नावाची शिफारस केली होती. मला मुख्यमंत्री करण्याची तयारी सुरु होती. माझी सुरक्षा देखील वाढवण्यात आली होती. पण, पुढे ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद स्वत:कडे ठेवलं.” असा गौप्यस्फोट शिंदेंनी केला आहे. (CM Eknath Shinde)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community