IPL 2024, Sunil Narain : सुनील नरेनने मोडला मलिंगाचा ‘हा’ जुना विक्रम 

IPL 2024, Sunil Narain : बंगळुरू विरुद्ध फलंदाजीत अपयशी ठरलेल्या नरेनने गोलंदाजीत २ बळी टिपले 

187
IPL 2024 PBKS vs KKR : आयपीएलमध्ये सुनील नरेनची विराट कोहलीच्या ‘या’ विक्रमाशी बरोबरी
  • ऋजुता लुकतुके

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्ध ३४ धावांत २ बळी मिळवत कोलकात्याच्या सुनील नरेनने (IPL 2024, Sunil Narain) लसिथ मलिंगाचा (Lasith Malinga) एक मोठा विक्रम मोडला आहे. गोलंदाजीतील एक महत्त्वाचा मापदंड या सामन्यात सुनीलने गाठला. महिपाल लोमरोव्हचा बळी हा सुनील नरेनचा कोलकाता संघाकडून घेतलेला १७१ वा बळी होता. एकाच संघासाठी सर्वाधिक बळी मिळवण्याचा विक्रम आता सुनील नरेनच्या (IPL 2024, Sunil Narain) नावावर जमा झाला आहे.  (IPL 2024, Sunil Narain)

(हेही वाचा- Pune-Mumbai Expressway: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहनांची वेगमर्यादा वाढवली; कारण ?)

फलंदाजीत नरेन १० धावा करून बाद झाला. पण, हे अपयश त्याने गोलंदाजीत धुवून काढलं. कॅमेरुन ग्रीन आणि महिपाल रोमरोव्ह हे महत्त्वाचे बळी त्याने मिळवले. आयपीएलमध्ये १६९ सामन्यांत नरेनने १७२ बळी मिळवले आहेत. त्याची सरासरी आहे ती २५ धावांची. तर त्याचा स्ट्राईकरेटही २२ धावांचा आहे. १९ धावांत ५ बळी ही त्याची सर्वोत्तम आयपीएल कामगिरी आहे. आयपीएलच्या इतिहासातील तो चौथा यशस्वी गोलंदाज आहे. (IPL 2024, Sunil Narain)

(हेही वाचा- IPL 2024, Virat Kohli : विराट कोहलीला बाद दिलेला चेंडू नोबॉल का नव्हता?)

एकाच संघाकडून दीडशे बळी मिळवलेल्या खेळाडूंमध्ये जसप्रीत बुमरा (Jaspreet Bumrah) (मुंबई इंडियन्स १५१ बळी) (MI), भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) (सनरायझर्स हैद्राबाद १५० बळी) (SRH) आणि ड्वेन ब्राव्हो (चेन्नई सुपरकिंग्ज १४० बळी) (CSK) या खेळाडूंचा समावेश आहे. आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळायला लागल्यापासून सुनील नरेन स्पर्धेतील एक मोठी ताकद म्हणून समोर आला आहे. फलंदाज म्हणूनही त्याने आतापर्यंत २८६ धावा केल्या आहेत. (IPL 2024, Sunil Narain)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.