कर्नाटकातील हुबळी येथील कॉलेज कॅम्पसमध्ये नेहा हिरेमठ या अल्पवयीन हिंदू मुलीची या प्रकरणात अनेक वेळा चाकू हल्ला करून हत्या करण्यात आली होती. या हल्ल्याचे चित्रण केलेला व्हिडियोही प्रसारित करण्यात आला होता. या हत्येचा निषेध करण्यासाठी महात्मा बसवेश्वर स्मारक, निगडी प्राधिकरण येथे यासंदर्भात नुकतेच आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने आंदोलनकर्ते सहभागी होऊन नेहाला न्याय मिळवण्याची मागणी केली. (Neha Hiremath)
यावेळी आंदोलनकर्त्यांनी “फयाझ को फशी दो” आणि “जस्टिस फॉर नेहा”, अशा त्वेषाने घोषणा दिल्या. या घोषणा दिल्या. हत्या करणाऱ्या आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा मिळावी, अशी मागणीही यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली. कोल्हापूर, पंढरपूर, पिंपरी-चिंचवड, धाराशिव आणि कर्नाटकात विविध ठिकाणी नेहाच्या हत्येच्या निषेधार्थ आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी सुरू आहे.
प्रत्येक हिंदू बांधवापर्यंत हा विषय पोहोचण्याचा निश्चय आंदोलनाच्या माध्यमातून आंदोलनकर्त्यांनी केला. पीडित नेहाला न्याय मिळेपर्यंत आंदोलनकर्ते शांत बसणार नाहीत, असा निश्चयही त्यांनी यावेळी केला आहे. या आंदोलनात किशोरवयीन तरुणी मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.
(हेही वाचा – D. Gukesh : १२व्या वर्षी ग्रँडमास्टर किताब ते कँडिडेट्स चषक, असा आहे डी गुकेशचा प्रवास)
फयाझ नावाच्या आरोपीने नेहावर चाकू हल्ला केला. या हल्ल्याचे चित्रण करून त्याची व्हिडियो क्लिप तयार केली होती. ही क्लिप बघून ज्यांना धक्का बसला, असे लोकंही या हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलनात सहभागी झाले होते. या अत्यंत घृणास्पद कृत्याची शिक्षा म्हणून फयाझला फाशी देणे पुरेसे नाही, अशी भावनाही यावेळी अनेक लोकांनी व्यक्त केली. फयाझविषयी अनेकांनी प्रश्न उपस्थित केले.
लेफ्टनंट कर्नल जे. एस. सोधी (निवृत्त) म्हणाले की, जेव्हा “महासत्ता” किंवा “जागतिक भू-धोरणात्मक शक्ती” प्रत्यक्ष युद्धात सामील होतात तेव्हा महायुद्ध सुरू झाले असे म्हटले जाते. रशिया, अमेरिका आणि चीन या या शक्ती आहेत, असे ते म्हणाले. “जोपर्यंत ते युद्धात सहभागी होत नाहीत, तोपर्यंत त्याला तिसरे महायुद्ध म्हटले जाणार नाही”, असे त्यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले. मेजर जनरल (डॉ.) शशी अस्थाना यांनी सध्या सुरू असलेल्या परिस्थितीविषयी सांगितले की, हे जागतिक युद्ध नव्हे, तर आक्रमक शीतयुद्ध आहे. अमेरिका आणि रशियादरम्या तसेच अमेरिका आणि चीनदरम्यान जे युद्ध झाले त्याचे हे मिश्रण आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community