Lok Sabha Election 2024 : मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार Srirang Barne यांचा अर्ज दाखल

आकुर्डी-प्राधिकरण येथील ‘पीएमआरडीए’च्या कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला

152
Lok Sabha Election 2024 : मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार Srirang Barne यांचा अर्ज दाखल

मावळ मतदारसंघातील महायुतीचे (Mahayuti Candidate) उमेदवार श्रीरंग बारणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (CM Eknath Shinde) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), मंत्री चंद्रकांत पाटील (Minister Chandrakant Patil) या युतीच्या तीन प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आकुर्डी-प्राधिकरण येथील ‘पीएमआरडीए’च्या कार्यालयात २२ रोजी एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भव्य मिरवणूक काढून शक्तीप्रदर्शन करण्यात आले.

(हेही वाचा – Sanjay Raut : महाराष्ट्राच्या राजकारणात शकुनी कोण?)

बारणे हे यापूर्वी दोनवेळा शिवसेना, भाजप युतीतर्फे या मतदारसंघातून निवडून आले आहेत. मागील निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचा पराभव करून ते ‘जायंट किलर’ (Giant Killer) ठरले होते. यावेळी खुद्द अजित पवार बारणे यांच्या प्रचारात सहभागी झाले असल्यामुळे ही त्यांच्या जमेची बाजू बनली आहे.

(हेही वाचा – Mushtaq Antulay यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश, काँग्रेससाठी मोठा धक्का)

बारणे यांचा अर्ज दाखल करण्यासाठी मंत्री दीपक केसरकर, प्रवीण दरेकर, माजी मंत्री बाळा भेगडे, आमदार अण्णा बनसोडे, सुनील शेळके, अश्विनी जगताप, महेंद्र थोरवे, महेश बालदी, उमा खापरे, माजी खासदार अमर साबळे, रामशेठ ठाकूर, आरपीआयच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे आदी प्रमुख नेते उपस्थित होते. याशिवाय मतदारसंघातील महायुतीच्या घटक पक्षांचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष व सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.