पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुका येथील कडूस परिसरात दक्षणा फाउंडेशन (Dakshana Foudetion) ही गैरसरकारी व सेवाभावी संस्था (Non-Governmental and Charitable Organizations) आहे. ही संस्था ग्रामीण भागातील अभ्यासात हुशार असणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना आयआयटी (IIT) व मेडिकल एंट्रेन्स (Medical Intrance) परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन करते. राज्यभरातून गरीब विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येतात. संस्थेमध्ये १८ ते २० वयोगटातील जवळपास ६०० पेक्षा ज्यास्त विद्यार्थी, विद्यार्थीनी आहेत. यातील ६० ते ८० विद्यार्थ्यांना शुक्रवार दुपारी राजमा आणि रात्री कांद्याची पात व बटाट्याची भाजी खाल्या नंतर विद्यार्थ्यांना पहाटे ०२ नंतर मुलांना मळमळ, उलट्या होऊ लागल्या, विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा (Food poisoning) झाल्याने जुलाब, डोकेदुखी, मळमळ व अंगदुखीचा त्रास जाणवू लागला. शनिवारी सकाळी विद्यार्थ्यांना अधिक त्रास होऊ लागल्यामुळे उपचारासाठी चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार सुरु करण्यात आले. (Poison)
दक्षणा फाउंडेशन या कोचिंग सेंटर (Food poisoning Coching Centar) मधील जेईई आणि नीट परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या ८० पेक्षा ज्यास्त विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली आहे. ही घटना शनिवारी घडली असून, सर्व विद्यार्थ्यांना जवळील रुगणलयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यापैकी ४ विद्यार्थ्यांची प्रकृती जास्त खालावलेली असून, ०२ विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील वायसीएम रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. २२ मुले आणि ७ मुली असे २९ विद्यार्थ्यांवर चांडोली (ता. खेड) येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.
काही विद्यार्थ्यांवर अतिदक्षता विभागात उपचार
काही विद्यार्थ्यांना अधिक त्रास होत असल्याने त्यांना काही वेळ अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांच्यादेखील प्रकृतीत सुधारणा झाल्यावर जनरल विभागात हलविण्यात आले. राज्यातून आणि राज्याबाहेरून जेईई आणि आयआयटी अशा पूर्वपरीक्षांच्या सिद्धता अभ्यासक्रमासाठी येथे ५५० विद्यार्थी निवासी आहेत.
या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील, निरिक्षक राजकुमार केंद्रे, उप निरिक्षक ज्ञानेश्वर राऊत आदींनी रुग्णालयाला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. तसेच चांडोली ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पूनम चिखलीकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. इंदिरा पारखे आणि पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांची विचारपूस केली. (Poison)
Join Our WhatsApp Community