Lok Sabha Election 2024 : सूरतमध्ये निकालाआधीच झाला भाजपाचा पहिला खासदार ; काँग्रेस म्हणते ‘ही’ मॅच फिक्सिंग

लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे खाते उघडले आहे. काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने उर्वरित उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने भाजपाचे उमेदवार मुकेश दलाल हे बिनविरोध विजयी झाले.

309
Lok Sabha Election 2024 : सूरतमध्ये निकालाआधीच झाला भाजपाचा पहिला खासदार ; काँग्रेस म्हणते ‘ही’ मॅच फिक्सिंग

देशात सर्वत्र लोकसभा २०२४ निवडणुकीची जय्यत तयारी चालू असून, उमेदवार जिंकून येण्यासाठी जीवाचं रान करत आहेत. पण गुजरातमधील सूरत येथे कॉँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज बाद केल्यानंतर व इतर ८ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्यानंतर भाजपाचे लोकसभा उमेदवाराची बिनविरोध (Unopposed Lok Sabha candidate of BJP) निवड झाली. मात्र, निवडणूक आयोगाकडून यांची अधिकृत घोषणा केली जाईल. तर यावर प्रतिउत्तर म्हणून काँग्रेसने प्रश्न उपस्थित करत हे मॅच फिक्सिंग असल्याचे म्हटले आहे. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Piyush Goyal : केंद्रीय मंत्री पीयूष गोयलांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने जमले उ. भारतीय बांधव)

निवडणूक अधिकारी डॉ. सौरभ पारधी (Election Officer Dr. Saurabh Pardhi) यांनी आदेश दिले की नीलेश कुंभानी (Neelesh Kubhani) यांच्या उमेदवारीच्या वेळी स्वाक्षरी करणारे तिघे उपस्थित नव्हते. पुढे, काँग्रेस उमेदवार नीलेश कुंभानी यांच्या उमेदवारीत दिलेली स्वाक्षरी चुकीची असल्याचे तपासात उघड झाले. दरम्यान, बिनविरोधी निवड झालेले मुकेश दलाल (Mukesh Dalal) हे भाजपाचे लोकसभा उमेदवार आहेत. तसेच गुजरात भाजपाचे अध्यक्ष सी. आर, पाटील (Gujarat BJP President C. R. Patil) यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू मानले जातात. तर प्रथमच सूरतच्या जागेवरून बिनविरोधात उमेदवार म्हणून निवडून आले आहेत. इतर सर्व उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे दलाल यांचा विजय निश्चित झाला. निवडणूक आयोगाकडून दलाल यांच्या विजयाची अधिकृत घोषणा केली जाईल. आता गुजरातच्या २५ जागांसाठी ०७ मे रोजी मतदान होणार आहे.  (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Poison : कोचिंग सेंटरमधील अन्न खाल्ल्याने ६० हून अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा, ४ जणांची प्रकृती गंभीर ; चौकशी सुरू)

काँग्रेसने केले हे आरोप –  

काँग्रेसने मॅच फिक्सिंग (Congress Match Fixing) म्हटले असून, त्याचवेळी उमेदवारी नाकारल्याचा ठपका काँग्रेसने सरकारवर ठेवला आहे. सरकारच्या धमकीपुढे सगळेच घाबरले आहेत, असे काँग्रेसने म्हटले आहे. काँग्रेस नेते आणि अधिवक्ता बाबू मांगुकिया (babu Mangukiya) म्हणाले की, निवडणूक अधिकाऱ्याने चौकशी करावी आणि फॉर्मवर स्वाक्षरी केली आहे की नाही ते पाहावं. तसेच स्वाक्षऱ्या न करता फॉर्म रद्द करणे चुकीचे आहे. सह्या योग्य आहेत की अयोग्य आहेत हे तपासल्याशिवाय फॉर्म रद्द करणे चुकीचे आहे, असे मांगुकिया म्हणाले. (Lok Sabha Election 2024)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.