मुंबई २६/११च्या हल्ल्यापुर्वी डेव्हिड हेडलीला शिवसेना भवन फिरवणाऱ्या राजाराम रेगेला कोलकाता पोलिसांनी मुंबईतील माहीम परिसरातून अटक केली आहे. राजाराम रेगे याने तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) यांच्या कोलकाता येथील निवासस्थानाची रेकी केल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली असल्याची माहिती कोलकाता पोलिसांनी दिली आहे. पश्चिम बंगाल पोलिसांनी रविवारी रात्री माहीम पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केल्याची माहिती परिमंडळ ५च्या पोलीस उपायुक्त तेजस्वीनी सातपुते यांनी दिली आहे. (Abhishek Banerjee)
राजाराम रेगे याचे २६/११ मुंबई हल्ल्यात देखील नाव आले होते. २६/११च्या हल्ल्यातील आरोपी डेव्हिड हेडली याला दादरच्या शिवसेना भवनात घेऊन जाणारा राजाराम रेगे होता अशी माहिती समोर येत आहे. राजाराम रेगे हा मुंबईच्या माहीम परिसरात राहण्यास असून रेगे हा १८ एप्रिल रोजी कोलकाता येथील तृणमूल काँग्रेसचे खासदाराच्या घर आणि कार्यालयाबाहेर दिसले होता. याप्रकरणी अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) यांच्या कार्यालयाकडून स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि नंतर एका पश्चिम बंगाल पोलिसाच्या पथकाने रविवारी रात्री माहीम पोलिसांची मदत घेऊन रेगेला ताब्यात घेऊन कोलकत्ता येथे रवाना झाले. राजाराम रेगे याने पश्चिम बंगाल येथे मुंबईत झालेल्या २६/११ सारखा हल्ल्याचा कट रचला होता, असे कोलकत्ता पोलिसांचे म्हणणे आहे. (Abhishek Banerjee)
(हेही वाचा – Poison : कोचिंग सेंटरमधील अन्न खाल्ल्याने ६० हून अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा, ४ जणांची प्रकृती गंभीर ; चौकशी सुरू)
२६/११च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपींच्या संबंधांचा पश्चिम बंगाल पोलीस तपास करत आहेत. तृणमूल काँग्रेस नेत्याच्या घराच्या आणि कार्यालयाच्या रेकीमागे दहशतवादी कृत्य करण्याचा त्यांचा हेतू आहे का याचा शोध कोलकाता पोलिसांचे विशेष पथक (STF) घेत आहे. मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्यात कथितरित्या सहभागी असलेला राजाराम रेगे कोलकाता येथे दिसला होता. तो दक्षिण कोलकाता येथील एका हॉटेलमध्ये थांबला होता. त्याने तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) आणि त्यांच्या पीएचा फोन नंबर शोधून काढला आणि फोन करून सांगितले की मला त्यांना भेटायचे आहे अशी माहिती कोलकत्ता पोलिसांकडून देण्यात आली आहे. (Abhishek Banerjee)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community